आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रुती राठीने कुटुंबाकडून मिळालेल्या संस्काराच्या बळावर यश संपादन केले, तिला भविष्यात डॉक्टर व्हायचं आहे, तर मोक्षा वसाणीला खूप शिकत मोठे होऊन आपल्या वडिलांचा सांभाळ करायचा आहे.
सर्वोदय कॉलनीत सोळा जणांचे कुटुंब एकत्र राहते. मोठ्या असलेल्या परिवारातील इतर भावंडांप्रमाणे डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून श्रुती दीपक राठीनेही ९४.८३ टक्के गुण मिळवून बारावीच्या निकालात गुणवत्ता यादीत नाव मिळवले आहे. तिचे वडील शहरात कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवतात तर आई विद्या गृहिणी आहे. उत्तमचंद राठी यांनी चारही मुलांना अध्यात्मिक संस्कारासोबत शैक्षणिक महत्त्व समजल्याने प्रदीप, पवन, गिरीश व दीपक राठी या चार जणांच्या मुलांच्या संस्काराला शिक्षणाची जोड मिळाली. कुटुंबातील चार मुले वैद्यकीय शिक्षणाच्या मार्गावर आहेत. इतर भावंडांबरोबरच श्रुतीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मोक्षा वसाणी देणार वडिलांना आधार म्हातारपणी आपला सांभाळ व्हावा यासाठी अनेकांना वारसदार म्हणून मुलगा हवा असतो. मात्र याला अपवाद म्हणून शहरातील शैलेश वसाणी यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. बुधवारी हाती आलेल्या बारावीच्या निकालात त्यांची मुलगी मोक्षाला ९४ टक्के गुणांसह गुणवत्ता यादीत स्थान मिळाल्याने त्यांनी आंनद व्यक्त केला आहे. सामान्य परिस्थितीत आपल्या मुलीला सांभाळून आई दक्षा यांनी टेलरिंगचा व्यवसाय करीत घराला हातभार लावला. मार्केटमध्ये वडील खरेदीचे काम करतात. वसाणी यांनी आपल्या मुलीला शिक्षण देऊन आपल्या सूर्यास्ताची शिदोरी म्हणून पाहिले आहे. मोक्षालाही वडिलांचा आधार बनायचे आहे. मोक्षाला चित्रकलेत आवड असून ती उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुलांचे पेंटिंग क्लास सुद्धा घेत होती. आवडीप्रमाणे काही करावं मात्र मात्र आईवडिलांना अभिमान वाटेल या क्षेत्रात काम करण्याची ईच्छा मोक्षाने व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.