आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्लेखनीय कामगिरी:लिजियन स्पोर्ट्स क्लबचे स्केटर्स सिद्धार्थला‎ सुवर्णपदक, तर आरव याला कांस्यपदक‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्केटिंग असोसिएशन ऑफ‎ महाराष्ट्रद्वारे आयोजित तिसऱ्या‎ राज्यस्तरीय मिनी रोलर स्केटिंग‎ चॅम्पियनशिपमध्ये ११ वर्षांखालील‎ वयोगटात अमरावतीचे उदयोन्मुख‎ स्केटर्स सिद्धार्थ सागर मातोलेने‎ सुवर्ण व रौप्यपदक जिंकले तर‎ आरव जितेंद्र पुराते याने कांस्य‎ पदकाची कमाई केली.‎ विमाननगर स्केटींग रिंग पुणे‎ येथे २५ व २६ रोजी झालेल्या या‎ स्पर्धेत राज्यभरातून मोठया‎ संख्येत स्केटर्स सहभागी झाले‎ होते. त्यांच्यावर मात करून‎ अमरावतीकर स्केटर्सने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उल्लेखनीय कामगिरी केली.‎ दोन्ही स्केटर्सने उत्कृष्ट खेळ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करीत अभिमानास्पद कामगिरी‎ केली.

ही स्पर्धा स्केटिंग‎ असोशियन ऑफ महाराष्ट्राचे‎ अध्यक्ष पुष्पेंद्रा कुमार सिंग सर‎ यांच्या नेतृत्वात झाली. पदक‎ विजेत्या खेळाडूंचे श्री गणेशदास‎ राठी छात्रालय समितीचे अध्यक्ष‎ वसंतकुमार मालपाणी, हरिकिशन‎ मालू इंटरनॅशनल स्कूलचे‎ संस्थापक आशिष मालू,‎ तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य‎ डॉ. मालू, महर्षी पब्लिक स्कूलचे‎ संस्थापक प्रशांत राठी, लिजियन‎ स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष अनुज‎ तिवारी यांनी अभिनंदन केले.‎ स्केटर्सने यशाचे श्रेय प्रशिक्षक‎ अनुजकुमार परतानी, मयूर‎ चौधरी, अमर खंडारे व आपल्या‎ आई-वडिलांना दिले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...