आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मांतर प्रतिबंधक तसेच लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदानमास अभिवादन समितीद्वारे आयोजित विशाल हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा रविवारी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात सुमारे ३ ते ४ हजार नागरिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी हाती भगवे ध्वज व मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झाले. तत्पूर्वी, सकाळपासून दुपारी २ पर्यंत शहराच्या विविध भागातील दुकाने बंद राहिली. त्यामुळे मुख्य बाजारपेठेसह मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट होता. २ नंतर दुकाने उघडली.
राजकमल चौकातील नेहरू मैदानावरून स. ११.३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली. त्यावेळी मोठ्या संख्येत कार्यकर्ते हातात विविध मागण्यांचे फलक व भगवे ध्वज घेऊन मार्गक्रमण करायला लागले. मागील काही वर्षांत हिंदू धर्मातील काही नागरिकांना बेकायदेशीरपणे पैसे, नोकरी, लग्नाचे आमिष, तसेच इतर प्रलोभने दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली. तसेच धमकावून धर्मांतर करून घेतल्याचे आढळून आले. याच धर्तीवर संपूर्ण देशभरात वयात आलेल्या तरुण हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिष देत त्यांचे धर्मांतरण करून विवाह केल्याची प्रकरणे उजेडात आली. या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू धर्मरक्षण मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
हिंदू युवतींनी प्रशासनाला निवेदन सोपवले.
प्रमुख मागण्या : देशभरात लव्ह जिहाद विरोधी कायदा बनवा, ही सर्व प्रकरणे हाताळण्यासाठी स्पेशल कोर्टाची नियुक्ती करावी, वरील विषयांकरिता एक स्वतंत्र विभागाची स्थापना करावी. तसेच बेकायदेशीर धर्मांतरण करण्यावर बंदी आणावी, त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याकरिता स्वतंत्र विभाग स्थापन करून त्याचे मार्फत सदर कायद्याची अंमलबजावणी करावी, श्रद्धा वलकरच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टज्ञत चालवून अाराेपीस भर चौकात फाशी द्यावी, राष्ट्रपतींनी निवेदनावर त्वरित कारवाई करावी, या मागण्या केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.