आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबांधणीचीही सोय:ज्या घरात थांबले, ते गळते असल्याने कृषिमंत्र्यांनी केली घरबांधणीचीही सोय

धारणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी रात्री ज्या शेतकऱ्याकडे मुक्काम केला, त्या शेतकऱ्याचे घर गळते असल्याने कृषी मंत्र्यांनी तत्काळ त्यांना पक्के घर देण्याची सोय केली. त्यांच्या आवाहनानंतर तेथीलच एक कंत्राटदार पुढे आला आणि विटा, सिमेंट, वाळू आदी बांधकाम साहित्यासह पक्क्या घर बांधणीचा आराखडाही तयार करण्यात आला.

मेळघाटातील नेमकी परिस्थिती आणि शेतीविषयक प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे बुधवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी उशिरा रात्री मेळघाटात मुक्कामी पोहोचले. धारणीपासून काही अंतरावर असलेल्या साद्रावाडी येथील दत्तू ऊर्फ दत्तात्रय चुन्नीलाल पटेल आणि त्यांचे शेजारी असलेले अल्पभूधारक शेतकरी संजू किसन धांडे यांच्या घरी त्यांनी रात्रीचे जेवण घेतले. केळीच्या पानावर वाढण्यात आलेला ‘बाबा चावली’ म्हणून संबोधण्यात येणारा आदिवासींचा पारंपरिक भात, तुरीच्या डाळीचे वरण, रानभाजी, आलू वांग्याची रस्सेदार भाजी आणि विशेषत: मातीच्या चुलीवर बनवण्यात आलेल्या भाकरी.

बासरी, ‘गदली ससून’ने मंत्री सत्तार यांचे स्वागत
आगमनानंतर लगेच मंत्री महोदयांचे ग्रामस्थांकडून स्नेहील स्वागत करण्यात आले. बासरीचे मधुर सूर व पारंपरिक ‘गदली ससून’ नृत्याच्या सादरीकरणातून उत्साहपूर्वक वातावरणात तयार झाले होते. कृषी मंत्र्यांनी उशिरा रात्रीपर्यंत साद्रावाडीच्या आदिवासी शेतकऱ्यांसोबत भारतीय बैठकीतून नानाविध विषयावर खुली चर्चा केली. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या वागण्यामुळे सरकारी यंत्रणा थोडीशी चक्रावून गेली. परंतु आदिवासी-कोरकूंना मात्र प्रचंड आनंद झाला. मंत्री महोदयांना त्यांच्या वास्तविक जीवनशैलीचा अगदी जवळून अभ्यास करता आला.

बातम्या आणखी आहेत...