आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहीती:मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे कौशल्य विकास केंद्रे ‘स्किल इंडिया’ला लवकरच ; मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांची माहीती

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेली कौशल्य विकास केंद्रे रोजगारनिर्मितीला चालना देतील, असा विश्वास व्यक्त करतानाच, सातत्यपूर्ण प्रशिक्षणासाठी ही केंद्रे ‘स्कील इंडिया’ला जोडणार असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांनी दिली.

देशातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एक असून, त्यात कोअर व बफर क्षेत्र मिळून एकूण १३१ गावे आहेत. त्याशिवाय पुनर्वसन झालेली २० गावे आहेत. अशी एकूण १५१ गावे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येतात. या सर्व गावांमध्ये मुख्यत्वे आदिवासी समाज राहतो. येथे कोरकू आदिवासींचे प्रमाण जास्त आहे. शेतीसोबतच वनांवरही येथील स्थानिक अवलंबून आहेत. त्यामुळे वनांवरील ताण कमी व्हावा, तसेच स्थानिकांमध्ये रोजगारनिर्मिती होऊन विकासाचा मार्ग खुला व्हावा, यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पामार्फत युवक-युवतींसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आली आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे सर्व प्रशिक्षण केंद्रे ही केंद्र शासनाच्या ‘स्कील इंडिया पोर्टल’ला जोडण्यासाठी नोंदणीकृत करण्याचे काम होत आहे. अमरावती येथून मेळघाट व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान ही मुख्य प्रशिक्षक संस्था म्हणून नोंदणीकृत करण्यात आली आहे. याअंतर्गत इतर सर्व प्रशिक्षण केंद्रे नोंदणीकृत होऊन संस्थेला अनुदान प्राप्त होईल. त्यामुळे प्रशिक्षणात सातत्य राहील. मेळघाटातील युवक-युवती, विद्यार्थी प्रशिक्षित होऊन त्यांना रोजगार प्राप्त होईल. यामुळे स्थानिकांचे वनांवरील अवलंबित्व कमी होईल. स्थानिकांच्या उन्नतीसह वनांचे संवर्धनही याद्वारे साधले जाणार आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

प्रशिक्षण केंद्र स्कील इंडिया पोर्टलला नोंदणीकृत करण्यासाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, जिल्हा समन्वयक वैभव टेटू तसेच महात्मा गांधी फेलो अनुष्का लोहिया यांनी सहकार्य केले आहे. त्याचप्रमाणे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी मनोजकुमार खैरनार आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प तज्‍ज्ञ प्रफुल्ल सावरकर विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...