आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक क्षेत्रात क्रांती:कौशल्य विकास विभागाचा ‘निवड तुमची जबाबदारी आमची’ उपक्रम आजपासून

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शासकीय किंवा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या किंवा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने ‘निवड तुमची जबाबदारी आमची’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंगळवार,दि. १ नोव्हेंबरपासून हा उपक्रम सुरु करण्यात आला असून तो आगामी १५ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. या कालावधीत विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या क्षेत्रात कौशल्य विभाग त्यांना अभ्यासक्रम पुरवणार आहे. दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडत आहे. त्यामुळे आजच्या युवकांना रोजागाराभिमुख होण्यासाठी, त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात परिपूर्ण होण्यासाठीची ही संधी आहे.

दरम्यान. व्यवसायभिमुख आणि रोजगाराच्या संधी देणारे विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणातंर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम निवडता येणार आहेत. जेणेकरुन ते त्या क्षेत्रात नवीन करु शकतील.

बातम्या आणखी आहेत...