आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎:वीट भट्टीतून निघणारा धूर‎ नागरिकांसाठी हानिकारक‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बडनेरा - कोंडेश्वर रस्ता आणि‎ अंजनगाव बारी ते निंभोरा‎ मार्गावरील शासकीय जागेवर वीट‎ भट्टीचा अवैध व्यवसाय सुरू‎ आहे. याच परिसरात नागरी‎ वस्त्यांसह महाविद्यालये आहेत.‎ यामधून निघणाऱ्या धुरामुळे‎ नागरिकांचे आरोग्य धोक्यात‎ आले आहे. त्यामुळे या वीटभट्टया‎ तात्काळ बंद करण्यात याव्यात.‎ अन्यथा तीव्र आंदोलन करणार‎ असल्याचा इशारा भीम आर्मी‎ संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना‎ निवेदनातून दिला आहे.‎ बडनेरा- कोंडेश्वर, बडनेरा -‎ अंजनगाव बारी या रस्त्यावर‎ शासकीय समाज कल्याण‎ वसतीगृह तसेच महाविद्यालये‎ आहेत.

हा भाग शैक्षणिक परिसर‎ म्हणून घोषित करण्यात आला‎ आहे. या भागात मोठ्या प्रमाणात‎ अवैध वीटभट्टया आहेत. यामधून‎ निघणाऱ्या धुरामुळे परिसरात‎ प्रदूषण झाले आहे. त्यामुळे या‎ परिसरात राहणाऱ्या वस्त्यांमधील‎ नागरिक, महाविद्यालयीन‎ विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्न‎ निर्माण झाला आहे. वीट भट्टीतून‎ निघणाऱ्या प्रदूषणामुळे कर्करोग,‎ दमा, अस्थमा, टीबी, लहान‎ मुलांचे आजार आदींचा धोका‎ वाढला आहे.

या परिसरात‎ राहणाऱ्या नागरिकांची आरोग्य‎ तपासणी करावी, संबधित‎ वीटभट्टी मालक, प्रदूषण नियंत्रण‎ बोर्ड या विभागाशी संबधीत‎ असलेल्या अधिकारी,‎ कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई‎ करण्यात यावी. तसेच अवैध वीट‎ भट्टी तत्काळ बंद करण्यात यावी,‎ या मागण्या दहा दिवसांत मान्य‎ कराव्यात. अन्यथा भीम आर्मीच्या‎ वतीने आगामी काळात तीव्र‎ आंदोलन करणार असल्याचा‎ इशारा जिल्हाधिकाऱ्यांना‎ निवेदनातून दिला आहे. यावेळी‎ जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे,‎ बडनेरा शहराध्यक्ष प्रदीप उसरे,‎ आकाश इंगळे, आकाश मोहोड,‎ सय्यद युसूफ, महेश मोहोड,‎ अक्षय देशमुख, अनुप भगत‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...