आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घवघवीत यश संपादन:श्रीमती राधादेवी बाकलीवाल शाळेच्या‎ विद्यार्थिनींचे एनएमएमएस परीक्षेत यश‎

वाशीम13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या‎ वतीने घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेत‎ श्रीमती राधादेवी बाकलीवाल कन्या विद्यानिकेतनच्या‎ सात विद्यार्थिनींनी यश संपादन केले. अार्थिक दुर्बल‎ घटक शिष्यवृत्ती परीक्षा २१ डिसेंबर २०२३ रोजी‎ घेण्यात आली होती. या परीक्षेत श्रीमती राधादेवी‎ बाकलीवाल कन्या विद्यानिकेतनमधील समिक्षा‎ बोळे, प्राची चंदेरे, श्रुतिका संगवार, मोनिका बुंधे,‎ अक्षरा ठाकुर, अनुराधा खंडारे, समृद्धी मनवर या‎ सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.‎ या विद्यार्थिनींचे श्री बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे‎ अध्यक्ष सुरेंद्रकुमार बाकलीवाल, व्यवस्थापक‎ माणिकचंदजी बज, मुख्याध्यापक रवींद्र कान्हेड,‎ शिक्षक धनंजय वानखेडे, वर्गशिक्षक विनायक‎ उज्जैनकर, राम राठोड, मनिष सदाफळे, ज्ञानेश्वर‎ वाकुडकर, रोशनी अंभोरे, मयुरी सावले, रोहिणी‎ ठोके, मोहीनी अहाळे, संतोष फुरसुले, प्रफुल्ल‎ काळे, लक्ष्मण भगिरथे यांनी अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...