आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवर रुबेला लस म्हणजे सुरक्षा कवच:आतापर्यंत 839 बालकांना डोस, जाणून घ्या लसीकरणाचे फायदे, 25 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या लसीकरणामुळे काहीसे मागे पडलेले गोवर-रुबेला लसीकरण पूर्ववत करण्यासाठी गेल्या 15 डिसेंबरपासून देशव्यापी मोहीम सुरु करण्यात आली असून आतापर्यंत या मोहिमेंतर्गत 839 बालकांना कवच प्राप्त झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांचे म्हणणे आहे.

जिल्हाभरात पहिल्या डोजसाठी 907 तर दुसऱ्या डोससाठी 1 हजार 49 बालके पात्र आहेत. शून्य ते पाच वयोगटाच्या बालकांना हे डोज दिले जातात. त्यासाठी राज्य शासनाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व महापालिकेचा आरोग्य विभाग अशा तिन्ही यंत्रणा कार्यरत आहेत. कोरोनामुळे थांबलेल्या या लसीकरणासाठी राज्य शासनाने विशेष मोहीम आखली असून ही मोहिम आगामी ख्रिसमस म्हणजेच 25 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

डीएचओ डॉ. दिलीप रणमले यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे आणि सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या नेतृत्वात ही मोहीम जिल्ह्यातील नागरी वस्त्या व ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे तर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नेतृत्वात उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये गोवर-रुबेलाचे लसीकरण सुरु आहे. ज्या बालकांना गेल्या दोन वर्षात ही लस देता आली नाही, त्यांच्या पालकांनी आवर्जून अशा केंद्रांमध्ये पोहचून आपल्या पाल्यांना लस द्यावी, असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे.

जाणून घ्या, गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम

ही लस 9 महीने ते 15 वर्ष पर्यंतच्या बालकांना द्यावयाची आहे म्हणजेच प्रत्येक 10 वी तील विद्यार्थ्यांना कंपलसरी द्यावयाची आहे.

ही लस अत्यंत सुरक्षित आहे. सेफ आहे, घाबरण्याचे कारण नाही. लस AD सिरिंज द्वारे दिली जाते. ही सिरिंज एकदा वपरात आल्यावर आपोआप लाॅक होते.

लस न दिल्यास होणारे आजार

  • गोवर आजार गंभीर आहे. फक्त पुरळ येणे म्हणजे गोवर नाही , तर गोवर आजारामुळे त्या मुलाची प्रतिकारशक्ती कमी होते व इतर आजाराने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.
  • भारतात गोवर मुळे अनेक मुले दगावतात.(गोवर डोस पूर्ण देत नाही. पहिला डोस 9 वा महिन्यात व दूसरा डोस 16 ते 24 महिने डोस पूर्ण करणे.)
  • रूबेला हा पण संसर्गजन्य आहे. त्यामुळे सर्दी, डोळे लाल होणे, ताप, कानाला सूज येणे. गरोदरपणात रुबेला आजार झाला तर होणाऱ्या बाळाला जन्मजात व्यंग , मोतीबिंदू होऊ शकतो किंवा सी.आर.एस. हा आजार होऊ शकतो.

डोस दिल्यास

गोवर व रूबेला आजाराची प्रतिकार शक्ती मिळते.

रूबेला पासून सुटका, गोवरपासून मुक्तता

लस किती सुरक्षित

1 सूई एकदाच वापरता येते (ऑटो सिरिन).

2 ते 8 अंश सेल्सियस तापमानात असते.

उजव्या दंडला डोस.

30 मिनट विद्यार्थी देखरेखीखाली असणार.

सोबत एमर्जेन्सी किट 1 डॉक्टर, 1 आरोग्य सेविका व 3 मदतनीस

कोणाला द्यावी

9 महिने ते 15 वयोगटातील सर्व मुले व मुली

पुर्वी दिली असेल तरी

10 वी चे सर्व मुलांना देण्यास काही हरकत नाही.

अंध ,अपंग विद्यार्थी असेल तरी

कोणाला नाही द्यायची

खूपच आजारी असेलेल्यांना

रुग्णालयात भरती असल्यास

बातम्या आणखी आहेत...