आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त प्राध्यापिकेची पोलिसात धाव:आईला विश्वासात घेत घर विकले; पण रक्कम हाती येताच तिला सोडले! मुलाविरुद्ध गुन्हा

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्ध प्राध्यापिकेच्या मुलाने तिला विश्वासात घेतले. त्यानंतर राहते घर विकले. घर विक्री करून आलेली रक्कम स्वतः घेऊन मुलगा वृद्ध आईला सोडून निघून गेला. हवालदील झालेल्या मातेला शेवटी पोलिस ठाणे गाठावे लागले.

मुलाविरुद्ध दिली तक्रार

मुलाने सोडल्यानंतर मातेने राजापेठ पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 11) रात्री उशिरा तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी मुलाविरुद्ध ज्येष्ठ नागरिक कायदान्वये गुन्हा दाखल केला आहे.

65 वर्षीय तक्रारदार वृद्ध महिला शहरातील एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती. वृध्द महिलेला एक मुलगा आहे. त्या मुलासोबतच राहत होत्या. दरम्यान काही दिवसांपूर्वी आईला विश्वासात घेऊन मुलाने राहते घर विक्री केले. घर विक्रीनंतर आलेली रक्कम स्वतःकडेच ठेवली. इतकेच नाही तर मिळणारे निवृत्तीवेतन व इतर रक्कमही मुलाने स्वतःकडे ठेवल्याचे वृद्ध महिलेने तक्रारीत नमूद केले.

घर खरेदी करणाऱ्यांनी सदर घर आम्ही खरेदी केले आहे, हे सांगितल्यानंतर या वृध्द महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. मुलानेच आपला विश्वासघात केला तसेच वृध्दपकाळात आपल्याला तो सोडून गेला. याचे दुखःही तिला झाले; यानंतर शनिवारी उशिरा रात्री राजापेठ पोलिस ठाणे गाठून मुलाविरुद्ध वृद्ध आईनेच तक्रार दिली असून पोलिसांनी यात गुन्हाही दाखल केला.

मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

तक्रारदार या निवृत्त प्राध्यापिका असून मुलाने विश्वासात घेऊन राहते घर विक्री केले. घर विक्रीतून आलेली रक्कम व इतरही रक्कम घेऊन मुलगा मला सोडून निघून गेला. अशी तक्रार त्यांनी दिली. त्यामुळे मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. - मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ

बातम्या आणखी आहेत...