आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:मेव्हणीच्या आत्महत्याप्रकरणी जावयाला शिक्षा‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जावयाच्या त्रासाला कंटाळून एका‎ तरुणीने आत्महत्या केली होती. ही‎ घटना कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या‎ हद्दीतील सालोरा (तसरे) गावात‎ पाच वर्षांपूर्वी घडली होती. या‎ प्रकरणात दोष सिद्ध झाल्यामुळे‎ येथील जिल्हा न्यायाधीश (क्रमांक‎ ३) आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या‎ न्यायालयाने दोषी जावयाला एक वर्ष‎ कारावासाची शिक्षा सुनावली आहे.‎ हा निर्णय न्यायालयाने शनिवारी (दि.‎ ४) दिला आहे.‎

विधी सूत्रांनी दिलेल्या‎ माहितीनुसार, सिद्धार्थ विश्वास‎ आठवले (३०, रा. सालोरा तसरे, ता.‎ तिवसा) असे शिक्षा प्राप्त आरोपीचे‎ नाव आहे. कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या‎ हद्दीतील सालोरा तसरे गावात २०‎ डिसेंबर २०१७ रोजी ही घटना घडली‎ होती. तक्रारदार सुनीता राजकुमार‎ गणेश (रा. सालोरा तसरे) व सिद्धार्थ‎ आठवले हे एकाच गावचे राहणारे‎ असून, सिद्धार्थ हा सुनीता गणेश‎ यांचा जावाई आहे. २० डिसेंबर २०१७‎ रोजी सुनीता यांची दुसरी मुलगी‎ दर्शना हिने फाशी घेऊन आत्महत्या‎ केली. सिद्धार्थ हा त्याची पत्नी‎ प्रणीतासह मेव्हणी दर्शना हिलासुद्धा‎ त्रास देत होता.

त्याच्या त्रासाला‎ कंटाळून दर्शनाने गळफास घेऊन‎ आत्महत्या केली. अशी तक्रार सुनीता‎ गणेश यांनी कुऱ्हा पोलिसांत दिली.‎ तक्रारीवरून पोलिसांनी सिद्धार्थ‎ आठवले विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त‎ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला‎ होता.‎ पोलिसांनी तपास पूर्ण करून‎ दोषारोप पत्र दाखल केले. या‎ प्रकरणात सरकारी पक्षातर्फे‎ अतिरिक्त सरकारी वकील अॅड.‎ सुनीत घोडेस्वार यांनी साक्षीदार‎ तपासले. या प्रकरणात आरोपीविरुद्ध‎ गुन्हा सिद्ध झाला.

त्यामुळे जिल्हा‎ न्यायाधीश (क्रमांक ३) चे‎ न्यायाधीश आर. व्ही. ताम्हाणेकर‎ यांनी आरोपीला एक वर्ष सश्रम‎ कारावास व २ हजार रुपये दंड व दंड‎ न भरल्यास दोन महिने साधा‎ कारावास तसेच तीन महिने सश्रम‎ कारावास. पाचशे रुपये दंड व दंड न‎ भरल्यास पंधरा दिवस साध्या‎ कारावासाची शिक्षा सुनावली आहे.‎ या प्रकरणात तपास कुऱ्हा ठाण्यातील‎ तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक‎ प्रणिल पाटील व एन. आर. वैश्य‎ यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून‎ राजेंद्र जोशी व एन.पी.सी. अरुण‎ हटवार यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...