आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Son Of Nagpur Dr. Girish Gandhi's Amrit Mahotsav Felicitated For His Substantial Contribution In The Social Field; The Event Will Be Held In Amravati On September 18

नागपूरचे सुपूत्र डाॅ. गिरीश गांधी यांचा अमृत महोत्सवी सत्कार:सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान; अमरावतीत होणार 18 सप्टेंबरला कार्यक्रम

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नामवंत सामाजिक कार्यकर्ते, माजी विधानपरिषद सदस्य डॉ. गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या 18 सप्टेंबर रोजी अमरावतीत त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आहे.

सामाजिक, पर्यावरण, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातील भरीव योगदानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेल्या गिरीश गांधी यांनी नुकतेच वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने या अमृत महोत्सवी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

बडनेरा रोडवरील महेश भवन येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित या समारंभात कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते व ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली गिरीश गांधी यांना सन्मानित केले जाईल.

याप्रसंगी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आमदार बच्चू कडू, आचार्य कमलताई गवई व नामवंत पत्रकार तथा वक्ते बाळासाहेब कुलकर्णी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सत्कार समारंभाच्या तयारीसाठी अ‌ॅड. आर. बी. अटल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत माजी मंत्री, कॉंग्रेसचे नेते डॉ. सुनील देशमुख, शिवेसेनेचे सहसंपर्क प्रमुख दिनेश बुब, राजाभाऊ देशमुख तळवेलकर, महेश सेवा समितीचे सचिव प्रवीणकुमार चांडक, प्रदीप देशपांडे, विलास मराठे, अविनाश दुधे, सुनील जयवंत देशमुख, संजय देशमुख, सुधीर जगताप, वैभव दलाल, ज्ञानेश्वर हिवसे, दिलीप दाभाडे, महेश गट्टाणी, प्रा. विजय दरणे, पीयूष लखोटिया, प्रा. सतीश पावडे, अॅड. श्रीकांत खोरगडे, प्रा.अविनाश असनारे, प्रा. गोविंद तिरमनवार, विजय हरवानी, प्रा. सुभाष गवई, प्रा. विकास अडलोक, वैभव कोनलाडे, शशांक लावरे, रेवन पुसतकर आदींचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आम्ही सारे फाउंडेशन, लोक फाउंडेशन, आझाद गणेशोत्सव मंडळ, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ, अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर असोसिएशन आदी आयोजक संस्था-संघटनांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...