आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळशी विवाहाला प्रारंभ:बाजारात ज्वारीची खोपटी, ऊस बोर अन् आवळा; पुजा साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची ​​​​​​​लगबग​​​​​​​

प्रतिनिधी | अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात ठिकठिकाणी तुळशी विवाहासाठी सजलेली पुजा साहित्याची दुकाने. - Divya Marathi
शहरात ठिकठिकाणी तुळशी विवाहासाठी सजलेली पुजा साहित्याची दुकाने.

दिवाळी संपताच चाहुल लागलेल्या तुळशी विवाहाला शनिवारपासून (दि. ५) प्रारंभ झाला आहे. त्यामुळे घरोघरी तसेच मंदिरात सार्वजनिक स्वरूपात ची लगबग सुरू झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सावासाठी शहरात ठिकठिकाणी पूजा साहित्याची दुकाने सजली आहेत. त्यासाठी लागणारी ज्वारीची खोपटी, ऊस, बोर, भाजी, आवळा, लाह्या, प्रसाद आदी पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. ठिकठिकाणी पुजा साहित्याची दुकाने सजली आहेत.

घराच्या अंगणातील तुळशी वृंदावने सजवण्यात लहानांबरोबर मोठ्यांनीही पुढाकार घेतला आहे. दरम्यान घराघरात तुळशी विवाहाची खास तयारी सुरू झाली आहे. हिंदू परंपरेनुसार तुळशी विवाह लावल्यानंतर घरातील लग्नकार्याला सुरूवात होते. त्यामुळे दिवाळीतील शेवटचा सण म्हणून तुळशी विवाहाकडे पाहिले जाते. त्यासाठी प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.

नवीन तुळशीची लागवड

तुळशी विवाहासाठी तुळशीचे रोप महत्त्वाचे आहे. तुळशी विवाहाप्रसंगी नवीन तुळशीची पुजा करून ती घराच्या आवारात लावली जाते. त्यामुळे तिची लागवड व संवर्धन याकडे नागरिक विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

तुळशी विवाहासाठी आवश्यक असलेल्या खोपट्या, ऊस चिंच, बोर, लाह्या, फोटो, ओटीचे सामान आदी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असून त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. - अविनाश रामटेके, विक्रेता

साहित्य खरेदीची लगीनघाई

पाच दिवस चालणाऱ्या तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या पूजा साहित्याच्या खरेदीकरिता बाजारपेठेमध्ये गर्दी होत आहे. महिला वर्ग तुळशी वृंदावन सजविण्यात, रंगविण्यात व्यस्त आहेत. शहरताील गांधी चौक, शेगाव नाका, रुख्मिणी नगर, दस्तुरनगर भागत विक्रेत्यांनी थाटलेल्या पुजा साहित्याच्या दुकानांमध्ये अबालवृद्धांची गर्दी दिसून येत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. आवळा, चिंच, मणी मंगळसूत्र, हळदीचे कापड, हिरव्या बांगड्या, ऊस, रांगोळी असे पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगीनघाई सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...