आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:सोयाबीन दर पोहोचले 5 हजार ते 5300 पर्यंत ; शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट आली आहे. यातच मागील महिनाभरापासून सोयाबीन प्रतिक्विंटल पाच हजारांवर गेले नव्हते. दरम्यान, शनिवारी (दि. ५) सोयाबीनच्या दरात थोड्या प्रमाणात तेजी आली असून, शनिवारी सोयाबीनचे प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार ३४१ रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. दरम्यान, शनिवारी बाजारात सोयाबीनची आवकसुद्धा वाढल्याचे समोर आले आहे.शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ हजार ६०७ पोते विक्रीसाठी आले होते. सोयाबीनच्या दरात आणखी काही प्रमाणात वाढ होऊ शकते, अशी चर्चा आहे. यंदा उत्पादनात घट आल्यामुळे शेतऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...