आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकिशोर मीना यांच्याकडून घेतला पदभार:विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी स्विकारला अमरावती परिक्षेत्राचा कार्यभार

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी तीन दिवसांपूर्वी जयंत नाईकनवरे यांची बदली झाली होती. दरम्यान सोमवारी (दि. 19) सकाळी विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी मागील दोन वर्षांपासून अमरावती परिक्षेत्राला पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रकिशोर मीना यांच्याकडून पदाची सूत्र स्विकारली आहेत.

जयंत नाईकनवरे हे नाशिक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत हाेते. दरम्यान तीन दिवसांपुर्वी राज्यातील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली आहे. त्या यादीनूसार नाईकनवरे यांची नाशिकवरुन अमरावती परिक्षेत्राला बदली झाली होती. जयंत नाईकनवरे हे मुळचे पुणे जिल्ह्यातील असून 1992 साली पोलिस उपअधिक्षक म्हणून पोलिस दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी राज्यात विवीध ठिकाणी सेवा बजावली. दरम्यान 2004 साली त्यांना 'आयपीएस' केडर मिळाले. पोलिस उपअधिक्षक म्हणून त्यांनी चार वर्ष 1994 ते 1998 या काळात विदर्भात सेवा दिली आहे. ही चार वर्ष ते वर्धा येथे कार्यरत आहे. त्यामुळे विदर्भातील भौगोलिक परिस्थितीची आपल्याला माहीती असल्याचे आयजीपी नाईकनवरे यांनी सांगितले आहे.

आलेल्या परिस्थितीनूरुप काम करणे सोईचे

पदभार स्विकारल्यानंतर आपले कोणत्या बाबींना प्राधान्य राहणार, याबाबत विचारले असता आयजीपी नाईकनवरे यांनी सांगितले कि, आम्ही नुकताच कार्यभार स्विकारला आहे. त्यामुळे सुरूवातीला परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांची माहीती घेण्यात येईल. तसेच पोलिस दलात काम करताना आपण ठरवून काम केल्यापेक्षा आलेल्या परिस्थितीनूसार निर्णय घेवून काम करणे अधिक सोईचे राहते व आपण त्यानूसारच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नविन पोलिस आयुक्तांची प्रतिक्षा

तीन दिवसांपूर्वीच्या बदली यादीतच सव्वा दोन वर्षांपासून अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांची सुध्दा मुंबईत बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूरवरुन नविनचंद्र रेड्डी यांची बदली झालेली आहे. मात्र नवे पोलिस आयुक्त रेड्डी हे अद्याप अमरावती पोलिस आयुक्त म्हणून रुजू झालेले नाहीत. सोमवारी ते रुजू होतील, अशी चर्चा पोलिस दलात होती मात्र सोमवारी त्यांनी पदभार स्विकारला नाही, त्यामुळे अमरावतीत आता नव्या पोलिस आयुक्तांची प्रतिक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...