आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली:विशेष पोलिस महानिरीक्षक नाईकनवरेंनी पदभार घेतला ; मीना यांच्याकडून स्वीकारला पदभार

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी तीन दिवसांपूर्वी जयंत नाईकनवरे यांची बदली झाली होती. सोमवारी (दि. १९) सकाळी त्यांनी दोन वर्षांपासून अमरावती परिक्षेत्राला पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रकिशोर मीना यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारली .

जयंत नाईकनवरे हे नाशिक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत हाेते. दरम्यान तीन दिवसांपूर्वी राज्यातील काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली आहे. त्या यादीनूसार नाईकनवरे यांची नाशिकवरुन अमरावती परिक्षेत्राला बदली झाली होती.

जयंत नाईकनवरे हे मुळचे पुणे जिल्ह्यातील असून १९९२ साली पोलिस उपअधिक्षक म्हणून पोलिस दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी राज्यात विवीध ठिकाणी सेवा बजावली. दरम्यान, २००४ साली त्यांना ‘आयपीएस’ केडर मिळाले. पोलिस उपअधिक्षक म्हणून त्यांनी चार वर्ष १९९४ ते १९९८ या काळात विदर्भात सेवा दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...