आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, अंजनगाव सुर्जी पंचायत समिती व ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त सहकार्याने नुकतेच शहरातील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पात्र दिव्यांगानां मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करणे. शासनाच्या विविध योजनांसाठी दिव्यांगांना प्रमाणपत्र आवश्यक असते. प्रमाणपत्र मिळाल्याने शहरासह तालुक्यातील दिव्यांगांनी प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून, शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधव व भगिनी मोठ्या संख्येने शिबिरामध्ये तपासणी करण्याकरिता उपस्थित होते.
या दिव्यांग तपासणी शिबिरात अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये डॉ. चिन्मय बुर्जक, डॉ. शशिकांत फसाटे, डॉ. अभिजीत चारथळ, डॉ. गुरूप्रकाश खोब्रागडे, डॉ. स्वाती सोनोने, डॉ. दिप्ती हरले, प्रमोद भक्ते, अजय सोळंके, सामाजिक सेवा अधीक्षक कविता सोळंके, डॉ.मृणाल इरले, भावना पुरोहित, श्रद्धा हरकंचे, अमोल भातकुलकर, सचिन टवलारे, सुशांत बडगे, नीलेश ढेंगळे, वैभव काठोळे, अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नालट, तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे, डॉ. तरुण पटेल, डॉ. साकिब, संदीप पाटील, अजय थेडे, अमोल राऊत, विशाल हंतोडकर, ग्रामीण रुग्णातील कर्मचारी यांच्यासह पंचायत समितीमधील कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले होते.
शिबिरादरम्यान दिव्यांगांची ऑनलाइन नोंदणी, तपासणी, दिव्यांगाचे प्रमाणपत्र वितरण आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिबिराला शहरासह तालुक्यातील हजारो दिव्यांगांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. शिबिराचे नियोजन अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नालट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर डोंगरे, प्रमोद भक्ते दिव्यांग विभाग सामान्य रुग्णालय अमरावती यांनी केले. हजारोंच्या संख्येने दिव्यांग बांधवांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.