आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण अभियान:‘चंद्रभागा आपल्या दारी’ अभियानास दर्यापुरात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्यापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील चार वर्षांपासून नगर परिषदेच्या सहकार्याने जल वृक्ष चळवळ, गाडगेबाबा महिला मंडळ, महसूल प्रशासन, विविध पक्ष व संघटनानच्या वतीने सुरू असलेल्या चंद्रभागा आपल्या दारी या पर्यावरण सिद्ध अभियानाला या वर्षी सुद्धा दर्यापुरात गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वातावरणातील उकाडा व उन्हात महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेवून फिरत्या विसर्जन जलकुंभात श्रींच्या मूर्ती संग्रहित केल्या.

शहरातील बनोसा, बाभळी, दर्यापूर या तीनही भागात अनेक विसर्जन जलरथ, निर्माल्य रथ फिरवण्यात आले. संपुर्ण वातावरण चंद्रभागामय झाले होते. शुक्रवारी नगर परिषद कार्यालयात गणेश पुजन करून अभियानाला तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, मुख्याधिकारी नंदू परळकर, विजय विल्हेकर, माणिक मानकर, अनिल कुंडलवाल, प्रा. राहुल सावरकर, वर्षा अग्रवाल, मालिनी पाटील, प्रा. संगीता पुंडे, नम्रता शहा, गणेश लाजूरकर, विजय लाजूरकर, मनोज तायडे, प्रवीण कासारकर, सुनील कुंडलवाल, विजय मेंढे, कपिल देवके, हर्षल दुधंडे, विलास घोगरे, जाकीर भाई, जयश्री चव्हाण, ज्याेती सोमवंशी, राजेंद्र पारडे, किशोर गणोरकर, राजू मुरतकर, नीता शेंडे, सिंधू विल्हेकर, पालिका कर्मचारी, गणेश भक्त व नागरिकांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. अभियानात सहभागी सर्व गणेश भक्तांना एसडीओ मनोज लोणारकर यांच्या हस्ते सन्मान प्रमाणपत्र देण्यात आलेत. गणेश भक्तांनी हजारो गणेश मूर्तींचे संकलन करुन अरुण पाटील गावंडे यांनी उपलब्ध करून दिलेल्या तलावात विधिवत विसर्जन केले.

निर्माल्य व मातीचा विनियोग करण्याचा निर्धार
गणेशोत्सवादरम्यान गोळा करण्यात आलेल्या निर्माल्याचे खत करून झाडांना देणार. तसेच गणेश तलावात विसर्जित मूर्तीची माती, नवीन गणेश मूर्ती साठी गणेश भक्तांना उपलब्ध करण्यात येईल, असा निर्धार या प्रसंगी जल वृक्ष चळवळ व नगरपरिषदेद्वारे करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...