आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकाचे विमाेचन:श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला ‘क्रीडा विद्यापीठाचा’ दर्जा आवश्यक

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव पद्मश्री प्रभाकराव वैद्य यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे विमोचन नुकतेच झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्य काळापासून तर आजवर देश आणि समाजाच्या नि:स्वार्थ विकासासाठी कार्य करणारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या कार्यकर्तृत्वाद्वारे आज मंडळाला जागतिक किर्ती प्राप्त झाली आहे. देशाच्या जडण घडणीमध्ये व क्रीडा क्षेत्रामध्ये सबंध देशाचं प्रतिनिधीत्व करणारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला आता क्रीडा विद्यापीठाचा दर्जा मिळणे गरजेचे असून त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार असल्याचे मत राज्यसभा सदस्य खा. डाॅ. अनिल बाेंडे यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार व लेखक मनाेहर परिमल यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक ‘प्रभाकरराव वैद्य एक झंझावात’ हे पुस्तक साकारले. या पुस्तकाचा विमोचन साेहळा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन मंडळाच्या स्व. साेमेश्वर पुसतकर सभागृह येथे करण्यात आला. या साेहळ्याला अध्यक्ष म्हणून कुलगुरू डाॅ. दिलीप मालखेडे व प्रमुख उपस्थितीमध्ये खा. डाॅ. अनिल बाेंडे उपस्थित हाेते. साेबचत माजी लेडी गव्हर्नर डाॅ. कमलताई गवई, ज्येष्ठ पत्रकार विलास मराठे, ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल, पुस्तकाचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार मनाेहर परिमल आदी मान्यवर उपस्थित हाेते. यावेळी नभ प्रकाशनच्या संचालिका अनुजा मिलींद डहाके यांच्या वतीने लेखक मनाेहर परिमल यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर व्यासपीठावर उपस्थित माजी लेडी गव्हर्नर डाॅ. कमलताई गवई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लेखक मनाेहर परिमल यांनी पुस्तक उभारणीची संकल्पना व अनुभव व्यक्त करीत सर्व मान्यवर व श्राेतावर्गाचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचलन व आभार डाॅ. किशाेर फुले यांनी केले. कार्यक्रमाला मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरी चेंडके, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, दीपा कान्हेगावकर, माजी महापाैर विलास इंगाेले, डाॅ. गाेविंद कासट, डॉ. पंकज मोरे, डॉ. अरूण खोडसकर, संजय तिरथकर, पुष्पा बोंडे, ठाकुर मालाणी, अभिनंदन पेंढारी, विनोद चव्हाण, पियुष देऊलकर, चारूदत्त चौधरी, डॉ. संजय खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...