आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष योजनेचा लाभ:सृष्टी, श्रावणी, सुरभी अन् महेक...| शाळेने राबवलेल्या विशेष योजनेचा लाभ

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजराती इंग्लिश हायस्कूलने १० वीच्या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी विशेष योजना आखली. सराव परीक्षा, समुपदेशन, अभ्यासावर विशेष लक्ष देण्यात आले. कारण कोरोनामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवयच सुटली होती. लिखाणाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. मंडळाकडूनही ३० मिनिटे अतिरिक्त वेळ मिळाला. शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच शाळेचा १०० टक्के निकाल लागला. दया चव्हाण, मुख्याध्यापिका, गुजराती इंग्लिश मीडियम हायस्कूल, अमरावती. यावेळीसुद्धा मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त शहरात पहिल्या तीनमध्ये देखील मुलींचीच वर्णी आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ऑनलाइन निकाल जाहीर झाला. तोपर्यंत विद्यार्थी व पालकांना निकालाची प्रचंड उत्सुकता लागली होती. सृष्टीला व्हायचंय आयएएस अमरावती येथील गुजराती इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी सृष्टी गणेश भारती हिला दहावीच्या परीक्षेत ९९.६० टक्के गुण मिळाले आहेत. ती या यशाचे श्रेय आई पद्ममा भारती व वडील गणेश भारती यांच्यासह शिक्षकवृंद यांना देते. सृष्टीचे वडील कनिष्ठ लिपिक असून, आई आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. सृष्टीला आयएएस व्हायचे असल्याचे तिने सांगितले. देशातील शिक्षण प्रणालीवर फोकस करून देशाचा विकास साधण्याचे तिचे स्वप्न आहे. तालुकानिहाय निकाल : अमरावती तालुक्यातून १० हजार ८३२ विद्यार्थी पात्र ठरले, त्यापैकी १० हजार ५७३ उत्तीर्ण झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यातून १ हजार ८३७ विद्यार्थी पात्र होते, त्यापैकी १ हजार ७९२ उत्तीर्ण झाले. चांदूर रेल्वे तालुक्यातून १ हजार २४२ विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी १ हजार २०४ उत्तीर्ण झाले. चांदूर बाजार तालुक्यातून २ हजार ७११ विद्यार्थी पात्र होते, त्यापैकी २ हजार ६२४ उत्तीर्ण झाले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातून २ हजार ३७६ विद्यार्थी पात्र होते, त्यापैकी २ हजार २९५ उत्तीर्ण झाले. अचलपूर तालुक्यातून ३ हजार ८९१ विद्यार्थी पात्र ठरले, त्यापैकी ३ हजार ७५७ उत्तीर्ण झाले. मोर्शी तालुक्यातून २ हजार २११ विद्यार्थी पात्र ठरले, त्यापैकी २ हजार १३३ उत्तीर्ण झाले. तिवसा तालुक्यातून १ हजार ४१३ विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी १ हजार ३६० उत्तीर्ण झाले. दर्यापूर तालुक्यातून २ हजार ३११ विद्यार्थी पात्र होते, त्यापैकी २ हजार २२३ उत्तीर्ण झाले. वरुड तालुक्यातून २ हजार ७६५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले, त्यापैकी २ हजार ६५७ उत्तीर्ण झाले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून १ हजार ६२९ विद्यार्थी पात्र होते, त्यापैकी १ हजार ५६१ उत्तीर्ण झाले. भातकुली तालुक्यातून १ हजार ३५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १ हजार २८९ उत्तीर्ण झाले. धारणी तालुक्यातून २ हजार १९९ विद्यार्थी प्रविष्ट होते, त्यापैकी २ हजार ५४ उत्तीर्ण झाले. चिखलदरा तालुक्यातून १ हजार ६५५ विद्यार्थी पात्र होते, त्यापैकी १ हजार ५१८ उत्तीर्ण झाले. महेकला सीए व्हायचंय

विद्यार्थ्यांचा निकाल अन्य कारणाने अनिर्णित विभागात जिल्हा चौथ्यास्थानी : अंजनगाव सुर्जी येथील सुरभी पटेल हिने मिळवले ९९.२० टक्के जिल्ह्यात ‘९९ प्लस’ मध्ये पहिल्या चारही मुलीच! दहावीचा निकाल 3.61% 96.39% महेक नितीन भट्टड हिने ९९ टक्के गुण मिळवले आहे. तिने सीए होण्याची इच्छा व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी मेहनत करून अभ्यास केला तर तो यशस्वी होतोच असे तिने ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले.

श्रावणी म्हणते, हार्डवर्क हेच यशाचे रहस्य कोणत्याही कामात हार्डवर्क करणे महत्वाचे आहे, मी देखील दहावीचा अभ्यास परिश्रमानेच केला. दररोज सहा तास अभ्यास आणि परीक्षेच्या दिवसात रात्रभर अभ्यास केल्याचे ९९.२० टक्के गुण मिळवणाऱ्या श्रावणी खांडे हिने सांगितले. ती म्हणते मला अपेक्षापेक्षा जास्त यश मिळाले. तिला मॅकेनिकल इंजिनिअर व्हायचे असून, याकरिता देखील तिने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. अमरावती| दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदा ९९ टक्क्यांपेक्षा जास्त गुण पटकावणाऱ्या शहरातील पहिल्या तीनमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. यात गुजराती इंग्लिश मीडियम स्कूलची सृष्टी भारती ९९.६०, हॉलिक्रॉसची श्रावणी खांडे ९९.२० तर महेक भट्टड हिने ९९ टक्के तसेच जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीच्या सीताबाई संघई कन्या शाळेची विद्यार्थिनी सुरभी पटेल हिने ९९.२० टक्के गुण घेऊन त्यांनी भरारी घेतली आहे. यंदा जिल्ह्याचा निकाल ९६.३९ टक्के लागला आहे. जिल्ह्यात ३८ हजार ४२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३७ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झालेे. यात शहरातील होलिक्रॉस, गुजराती इंग्लिश मीडियम हायस्कूल, मणिबाई गुजराती हायस्कूल, गोल्डन किड्स, समर्थ हायस्कूल, नारायणदास लढ्ढा, गणेशदास राठी, समर्थ हायस्कुल, सामरा आदी शाळांमधील काही विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण प्राप्त केले. होलिक्रॉसमधील ५२ विद्यार्थींनींना ९० टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत. तसेच मणिबाई गुजराती हायस्कूल येथील १७, ज्ञानमाता हायस्कूल येथील २५, गोल्डन किड्स येथील ३४ विद्यार्थी ९० टक्केच्यावर आहेत. 99.00% 99.20% 99.20% 99.60%

बातम्या आणखी आहेत...