आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रदूषणरहित इलेक्ट्रिकल बसेस अमरावती जिल्ह्यातील रस्त्यांवरही धावाव्यात, यासाठी एसटी कार्यालयाचे जोरदार प्रयत्न सुरू असून, प्राथमिक स्तरावर प्रस्ताव पाठवून ५० इलेक्ट्रिकल बसची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुख्यालयाकडे पाठपुरावाही सुरू आहे. या बसेस चालवण्यासाठी त्या वारंवार चार्ज करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाची सध्या महावितरणच्या मुख्य अभियंत्यांशी बाेलणी सुरू आहे.
अमरावती विभागीय नियंत्रक कार्यालयाद्वारे इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन आधी उभारले जाणार आहे. त्याशिवाय या बसेसच पुढे जाऊ शकणार नाहीत. अमरावती, वरूड, परतवाडा, मोर्शी, दर्यापूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी या ठिकाणीही चार्जिंग स्टेशन उभारले जाईल. कारण सर्वप्रथम या बसेस तालुक्याच्या ठिकाणी प्रवासी घेऊन जातील. अमरावतीहून निघाल्यानंतर त्या ज्या तालुक्यातील डेपोत थांबतील तेथेही त्यांना चार्ज करावे लागेल. प्रारंभी अमरावती, दर्यापूर, वरुड या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जातील. त्यानंतर इतर पाचही डेपोंमध्ये चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.