आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा:72 मुला-मुलींची वसतिगृह सुरू करा; पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे निवेदन

उमरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसीची जातीनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यामध्ये मुला मुलींची ७२ वसतीगृहे तात्काळ सुरू करण्याची मागणी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटना उमरखेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी स्वीकारले.महाराष्ट्र सरकारने यापूर्वी केंद्र सरकारला सर्वानुमते ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याची शिफारस केलेली आहे. त्याकरिता आपण केंद्र सरकारला ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याच्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवावे. केंद्र सरकारने ओबीसीची जातीनिहाय जनगणना न केल्यास बिहारच्या धरतीवर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी. राजकीय आरक्षणासंदर्भामध्ये बांठीया कमिशनने जो अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये राजकीय आरक्षण ओबीसीला मिळालं.

त्याबद्दल बांठीया कमिशनचे अभिनंदन परंतु १९३१ च्या जनगणनेच्या आधारे ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला बांठीया आयोगाने ३६ टक्के लोकसंख्या दाखवली हा ओबीसीवर सर्वात मोठा अन्याय आहे. त्यामुळे सरकारने बांठीया कमिशनची आकडेवारी दुरुस्त करावी व मंडल आयोगानुसार किमान ५२ टक्के ओबीसीला आरक्षण द्यावे. या पद्धतीची भूमिका व्यक्त करावी किंवा ओबीसीची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी. संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्रातील ओबीसी, एसबीसी व्हीजेएनटी विद्यार्थी मात्र उच्च शिक्षणापासून वंचित आहेत.

विदर्भातील सर्व सामाजिक ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी संघटनांच्या माध्यमातून सात ऑगस्टपासून मंडल दिनाची औचित्य साधून एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट मंडल यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेदरम्यान जवळपास ३५ ठिकाणी भेटी दिल्या १५ हजाराच्या वर ओबीसी जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ओबीसींवर संख्येने जास्त असून सुद्धा अन्याय होत आहे. तो त्वरित दूर करावा. आदींसह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी अॅड. संतोष जैन, कविता मारोडकर, शंकर जाधव, बबलू जाधव, अॅड. गजेंद्र चंद्रे, बाळासाहेब डाखोरे, दिलीप सुरते, आनंदराव हामंद, पांडुरंग खांडरे, राजेश खामनेकर, देवबंन गोस्वामी, अरविंद ओझलवार, साहेबराव धात्रक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...