आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गांधी विरुद्ध गांधी’ने जिंकली राज्य नाट्य स्पर्धा:5 ते 16 डिसेंबरदरम्यान 12 नाटकांचे सादरीकरण

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 16 डिसेंबरला संपलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या विभागीय फेरीचा निकाल तातडीने घोषित करण्यात आला असून त्यामध्ये अजीत द‌‌ळवी यांच्या ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. अंबापेठ क्रीडा क्लबने सादर केलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन अ‌ॅड. प्रशांत देशपांडे यांनी केले होते. त्यामुळे नाटकासोबतच त्यांनाही दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

12 नाटकांचे सादरीकरण

येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात गेले 15 दिवस राज्य मराठी नाट्य स्पर्धेची विभागीय फेरी पार पडली. या दरम्यान तब्बल 12 नाटकांचे सादरीकरण झाले. त्यामध्ये दोन नाटके मध्यप्रदेशातील कलावंतांनी सादर केली होती. तत्पूर्वीची आठ नाटके अकोला येथील केंद्रावर 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत सादर झालीत.

तातडीने परिक्षण, निकालाची घोषणा

या सर्व नाटकांचे परीक्षण तातडीने पूर्ण करुन राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने निकाल घोषित केला आहे. त्यानुसार ‘अथ इति नाट्यकला प्रतिष्ठान’च्या ‘समांतर’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाले असून प्रथम दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

'जनावर व्हाया माणूस' तृतीय

घोषित निकालानुसार श्री नटराज शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्या ‘जनावर व्हाया माणूस’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक आधी सांगितल्याप्रमाणे अ‌ॅड. प्रशांत देशपांडे यांना प्राप्त झाले असून द्वितीय पारितोषिक हर्षद ससाणे (नाटक - समांतर) यांना जाहीर झाले आहे.

प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक दीपक नांदगावकर (नाटक - कु.सौ. कांबळे), द्वितीय अजय इंगळे (नाटक - जनावर व्हाया माणूस), नेपथ्याचे प्रथम पारितोषिक शेखर बरणे (नाटक - गांधी विरुध्द गांधी), द्वितीय विवेक वाघ (नाटक - महादेवा जातो गा) तर रंगभूषेचे प्रथम पारितोषिक अभिजात देशमुख (नाटक - गांधी विरुध्द गांधी) आणि द्वितीय शुभम मातुरकर (नाटक - जनावर व्हाया माणूस) या कलावंतांना घोषित झाले आहे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गुरु बढारे, किशोर डावू आणि रवींद्र सावंत यांनी काम पाहिले.

यांना मिळाली उत्कृष्टतेची बक्षिसे

उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक विराग जाखड (नाटक - गांधी विरुध्द गांधी) व प्राची ढोके (नाटक- जनावर व्हाया माणूस) यांना मिळाले असून अश्विनी महाजन (नाटक - गांधी विरुध्द गांधी), वैष्णवी राजगुरे (नाटक - समांतर), पयोष्णी ठाकूर (नाटक - जनावर व्हायामाणूस), संजीवनी पुरोहीत (नाटक - काही सावल्यांचे खेळ), अनुराधा बाटोडकर (नाटक - कु.सौ. कांबळे), हर्षद ससाणे (नाटक - समांतर), वैभव देशमुख (नाटक - गांधी विरुद्ध गांधी), गणेश राणे (नाटक - महादेवा जातो गा) विक्की यादव (हमीदाबाईची कोठी) व तुषार काकड (जनावर व्हाया माणूस)

बातम्या आणखी आहेत...