आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य नाट्य स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात:गांधी विरुद्ध गांधी, थँक्यू मिस्टर ग्लाड, यासारख्या ऐतिहासिक नाटकांची असणार मेजवानी

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीत राज्य नाट्य स्पर्धेला सोमवार 5 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात दररोज सायंकाळी 7.00 वाजता एक नाटक याप्रमाणे 16डिसेंबरपर्यंत नाटकांची ही श्रृंखला चालेल.

राज्य मराठी नाट्य स्पर्धे अंतर्गत यावर्षी अमरावतीकर रसिकांना अनिल बर्वे यांची ऐतिहासिक कलाकृती हमीदाबाईची कोठी व थँक्यू मिस्टर ग्लाड आणि अजीत दळवी लिखित गांधी विरुद्ध गांधी यासारखी दर्जेदार आणि एकाहून एक सरस नाटके पहायला मिळणार आहेत.

उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी रजनीश जोशी लिखित भूल भिंगरीचा प्रयोग सादर केला जाईल. या नाटकाचे सादरीकरण वैष्णवी महिला व आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे केले जाणार असून दिग्दर्शन रिंकू सरोदे यांनी केले आहे.

अशी आहे नाटकं

  • 6 डिसेंबरला ‘जनावर व्हाया माणूस’ चा प्रयोग होणार असून तुषार काकड लिखित व दिग्दर्शित या नाटकाचे सादरीकरण नटराज शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा संस्थेद्वारे केले जाईल.
  • 7 डिसेंबरला किशोक पाचकवडे यांचे बी पॉझीटिव्ह.
  • 8 डिसेंबरला राजन बीवलकर यांचे खेळ नियतीचा.
  • 9 डिसेंबरला ला काही सावल्यांचे खेळ ही नाटके सादर केली जातील. काही सावल्यांचे खेळ हे नाटक प्रसन्न शेंबेकर यांनी लिहिले असून सागर रघुवंशी यांनी दिग्दर्शन केले आहे.
  • 10 डिसेंबरला कु.सौ. कांबळे ही गाजलेली कलाकृती सादर केली जाईल. महेंद्र सुके लिखित या नाटकाचे दिग्दर्शन दीपक नांदगावकर यांनी केले असून येथील गंधर्व बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्या नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे.
  • 12 डिसेंबरला प्रा. सलीम शेख लिखीत व हर्षद ससाणे दिग्दर्शित थलाई कुत्तल हे नाटक सादर होणार आहे. अथ इति नाट्यकला प्रतिष्ठाण या संस्थेतर्फे हे नाटक सादर केले जाणार आहे.
  • 13 डिसेंबरला हमीदाबाईची कोठी या नाटकाचे सादरीकरण इंदौरच्या अष्टरंग संस्थेद्वारे केले जाणार असून या नाटकाचे दिग्दर्शन अनिल चाफेकर यांनी केले आहे.
  • 14 ला अजीत दळवी लिखित गांधी विरुद्ध गांधी हे नाटक अंबापेठ क्रीडा क्लबद्वारे सादर केले जाणार असून अ‍ॅड. प्रशांत देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
  • 15 डिसेंबरला थँक्यू मिस्टर ग्लाड हे नाटक सादर होणार असून ते राज कानिटकर यांनी दिग्दर्शित केले आहे. अभिव्यक्ती श्रीविद्या शिक्षण संस्थेतर्फे ते सादर केले जाईल.
  • 16 डिसेंबरला डॉ. श्याम देशमुख लिखित व अशोक काळे दिग्दर्शित अपराजीत नाटकाचा प्रयोग होणार आहे. अभिरुची कला व क्रीडा मंदिरतर्फे या नाटकाचे सादरीकरण केले जाईल.
बातम्या आणखी आहेत...