आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही वर्षांतील परिश्रम, शहरात वाढलेले स्क्वॅश कोर्ट आणि त्यामुळेच खेळाडूंचा स्क्वॅश या खेळाकडे ओढा वाढल्यामुळे शहरातील स्क्वॅश पटू या खेळात राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत आहेत. स्क्वॅश हा काहीसा महागडा व कठिण खेळ आहे. तसेच या खेळासाठी आधी आवश्यक कोर्टही पुरेसे नव्हते. मात्र आता चार कोर्ट आहेत. लाकडी पृष्ठभाग व काचेची बंद खोली असे या कोर्टचे स्वरूप असते. कोर्टची संख्या वाढल्यामुळे खेळाडूंना सरावासाठी जास्त वेळ मिळायला लागला. त्यामुळे त्यांना या खेळात आवड निर्माण झाली. त्यांचा या खेळाकडे कलही वाढला. त्यामुळेच शहरात राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणारे स्क्वॅश खेळाडू घडत आहेत.
बडगुजर स्पोर्टस अकादमी साईनगर येथील खेळाडूंनी नुकत्याच विभागीय क्रीडा संकुल येथे जिल्हा स्क्वॅश रॅकेट असोसिएशनद्वारे आयोजित ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी व संगीत या प्रकारात चमकले. या खेळाडूंची जळगाव येथील राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड झाली. १३ वर्षांखालील मुलांच्या गटात इंद्राशसिंह राकेश बडगुजर, १५ वर्षांखालील गटात रुद्रांशसिंह राकेश बडगुजर, अवधूत प्रज्योत गुप्ते तर १७ वर्षांखालील गटात आदित्य प्रजापती, मानसी मेहरे व मयंक बिजवे यांनी उत्तम कामगिरी करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या खेळाडूंचे बडगुजर स्पोर्टस अकादमीचे पॅट्रॉन राणा दाम्पत्य, अध्यक्ष माणिक नेमाडे, उपाध्यक्ष डॉ. के.के.देबनाथ, सचिव डाॅ. राकेश बडगुजर, श्वेता बडगुजर, हेमंत जाधव, अध्यक्ष स्क्वॅश रॅकेट असोसिएशन प्रफुल्ल मेहता, मंगेश व्यवहारे, डाॅ. मंगला धोरण, मनीष गोस्वामी, अशोक असोरिया यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.