आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक कार्यक्रम:भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे आज शहरात; कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

अमरावती8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार,दि. २९ रोजी अमरावती दौऱ्यावर येत आहेत. पारी ३ वाजता अमरावती येथे पोहचतील. त्यानंतर त्यांचे संघटनात्मक व सामाजिक कार्यक्रम आहेत. भाजपच्या राजा पेठ येथील कार्यालयाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण व भाजप कार्यकर्ता मेळाव्यात दुपारी ४ वाजता उपस्थित राहून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ६ वाजता मोती नगर येथे शिरभाते मंगल कार्यालयातील तसेच कठोरा भागातील लुंगे लॉन येथील सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. रात्री ८.४५ वा. ते नागपूर-अमरावती महामार्गावरील वेलकम पाइंटच्या उद्घाटनाला उपस्थित राहून नागपूरकडे रवाना होतील. त्यांच्या या दौऱ्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली असल्याची माहिती किरण पातुरकर यांनी दिली.