आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगौरव सोहळा:उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांचे प्रतिपादन; विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम‎

अमरावती‎2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या क्षेत्रात आपल्याला आवड असेल, त्या‎ क्षेत्रात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. आपल्या‎ कृतीतून, वागण्यातून विद्यार्थ्यांनी भारताचे‎ सुजाण नागरिक होत, त्याचे जगाच्या पाठीवर‎ नाव करावे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी ‎आशिष बिजवल यांनी केले. कॅम्प परिसरातील ‎ स्थानिक विद्याभारती महाविद्यालय‎ महाविद्यालयात बुधवारी (दि. २२) कनिष्ठ ‎महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव‎ सोहळा झाला.

त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‎बिजवल बोलत होते.‎ महाविद्यालयाच्या ए. व्ही. थिएटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‎ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रज्ञा येनकर‎ होत्या. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून‎ विद्याभारती शैक्षणिक मंडळाचे सचिव डॉ.‎ अशोक चव्हाण, उपजिल्हाधिकारी आशिष ‎ बिजवल व अमरावती परीक्षा बोर्डाचे‎ सहाय्यक सचिव तेजराव काळे प्रामुख्याने‎ उपस्थित होते.

या प्रसंगी व्यासपीठावर कनिष्ठ‎ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एच. के.‎ सिसोदिया, उपप्राचार्य डॉ. टी. एस. वासनिक‎ उपस्थित होते. या वेळी प्रास्ताविकपर‎ मनोगतामधून उपप्राचार्य सिसोदिया यांनी‎ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव केला. या‎ वर्षीही कनिष्ठ महाविद्यालयाची निकालाची‎ उज्ज्वल परंपरा कायम राहिली असल्याचे‎ त्यांनी काढले. या प्रसंगी‎ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तेजराव काळे‎ म्हणाले, आपल्या समाजासाठी विद्यार्थ्यांनी‎ कार्य करावे. त्यांनी शाळा, महाविद्यालयात‎ मिळवलेल्या ज्ञानाचा तसेच व्यावहारिक‎ मूल्यांचा समाजाला विकासाच्या दिशेने‎ नेण्यासाठी हातभार लावावा.

त्यासाठी‎ प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही‎ केले. या गौरव समारंभाच्या अध्यक्ष प्राचार्य‎ डॉ. प्रज्ञा येनकर मनोगत व्यक्त करताना‎‎ म्हणाल्या, कोरोनाच्या या कठीण काळात‎ आपण अथक प्रयत्न करून यश संपादन केले. ‎असेच स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करत रहा.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वडोतकर तसेच प्रा.अर्चना अग्रवाल, तर आभार प्रा. स्वप्निल ‎मानकर यांनी केले. कार्यक्रमाच्या‎ यशस्वितेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष‎ परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक ‎ ‎ मोठ्या संख्यने उपस्थित होते.‎

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर.गुणगौरव सोहळ्यानंतर मान्यवरांसह उपस्थित विद्यार्थी.‎सोहळ्यात या गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला गौरव‎ या प्रसंगी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या प्रणव येवतीकर याला ९४.६७‎ टक्के गुण मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. वाणिज्य शाखेतून प्रांजली यादव‎ हिला ९३.९३ टक्के मिळाल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला.

तसेच कला शाखेतून पल्लवी‎ बुटलेहिला ८२.५० टक्के मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व्होकेशनल सायन्स ७०.५०‎ टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या शंतनु गुप्ता याचाही गौरव करण्यात आला. सोबतच कला‎ क्रीडामध्ये प्रावीण्यप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी पालकाच्या‎ वतीने श्रीहरी भोंबे व प्रा. रेखा येवतीकर यांनी मनोगत व्यक्त केले.‎ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर.गुणगौरव सोहळ्यानंतर मान्यवरांसह उपस्थित विद्यार्थी.‎

सोहळ्यात या गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला गौरव‎ या प्रसंगी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या प्रणव येवतीकर याला ९४.६७‎ टक्के गुण मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. वाणिज्य शाखेतून प्रांजली यादव‎ हिला ९३.९३ टक्के मिळाल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. तसेच कला शाखेतून पल्लवी‎ बुटलेहिला ८२.५० टक्के मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. व्होकेशनल सायन्स ७०.५०‎ टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या शंतनु गुप्ता याचाही गौरव करण्यात आला. सोबतच कला‎ क्रीडामध्ये प्रावीण्यप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी पालकाच्या‎ वतीने श्रीहरी भोंबे व प्रा. रेखा येवतीकर यांनी मनोगत व्यक्त केले.‎

बातम्या आणखी आहेत...