आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन; बंद झालेली नाफेडची हरभरा खरेदी सुरू करा

दर्यापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन
ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असताना ‘नाफेड’ने आठ दिवसांपासून शासकीय हरभऱ्याची खरेदी अचानक बंद केली आहे. या समस्येची दखल घेत शासकीय खरेदी पुन्हा तत्काळ सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण पाटील गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार डॉ. योगेश देशमुख व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

पावसाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असूनस शेतकऱ्यांचा हरभरा घरातच पडून आहे. हरभरा घरात पडून असल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडलेले आहे. हरभऱ्याची शासकीय खरेदीची अंतिम मुदत १८ जून जाहीर आहे. दरम्यान, अचानक खरेदी पंधरा दिवस आधी बंद करून केंद्र शासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. जर हरभऱ्याची शासकीय खरेदी सुरू केली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करेल व होणाऱ्या दुष्परिणामाला प्रशासन जबाबदार राहील, असे या वेळी राकाँचे डॉ. अभय पाटील गावंडे यांनी सांगीतले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष अनिल जळमकर, डॉ. अभय गावंडे, अरविंद घाटे, निनाद सावरकर, दिलावर शहा, जयप्रकाश पातुर्डे, तालुकाध्यक्ष अनुज हुतके, शहराध्यक्ष प्रतीक नाकट, वैभव ठाकरे, शंतनु बोरेकर, श्रीराम कडू, हर्षल खाडे, सुरेश साबळे, आकाश साबळे, प्रशांत मानकर, संदीप चावरे आदी उपस्थित होते.तहसीलदारांना निवेदन देताना अनिल जळमकर, डॉ. अभय गावंडे आदी.

बातम्या आणखी आहेत...