आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:शिक्षकांवरील आरोप थांबवा; शिक्षक समितीचा काळ्या फित लावून निषेध

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांचा वेगवेगळ्या मार्गाने जाणीवपूर्वक होत असलेला अपमान आणि आपले गुरुजी अंतर्गत वर्ग खोलीमध्ये शिक्षकांचे फोटो लावण्याचे दिलेले निर्देश त्वरित मागे घ्यावेत, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने काळ्या फिती लावून निषेध आंदाेलन केले.

शिक्षकांना शाळाबाह्य कामे कमी हाेत नसून, त्याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर हाेत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कामच असावे, यासाठी शिक्षकांच्या संघटनांकडून अनेकदा विविध माध्यमातून मागणी करण्यात येते. मात्र या मागणीची दखल न घेता आता केवळ नकारात्मक दुष्टीकोन समोर ठेवून समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा जाणिवपूर्वक बदनाम करण्याचा काहींकडून प्रयत्न होत असून असल्याचा आराेप शिक्षक समितीकडून करण्यात येत आहे. शैक्षणिक वातावरण दूषित केले जात आहे. शिक्षकांना स्वतः च्या जवाबदारीची पूर्णपणे जाणीव असून, ते चांगले काम करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात .

त्यांच्यावर देखरेख करण्याकारता प्रशासकिय यंत्रणा आहे. प्रमाणात अपवादात्मक बाबी सर्वच क्षेत्रात असतात . मात्र सतत नकारात्मक दृष्टीकाेनसमोर ठेवून व बेताल वक्तव्य करून शिक्षकांची मानसिकता खराब करण्याचे काम

करण्यात येत असल्याचा आराेप शिक्षकांनी केला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आवाहानाला प्रतिसाद देत जिल्हामधील शेकडो शाळांमधील शिक्षकांनी काळी फित बांधून कामकाज केले, असे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांनी कळवले आहे.

आम्हाला शिकवू द्या ः शिक्षकांना सतत दिल्या जात असणारी अशैक्षणिक कामे बंद करण्याची मागणी शिक्षक समितीने केली आहे. आम्हाला शिकवू द्या ,मुलांना शिकू द्या, अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने काळ्या फिती लावून रोष व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...