आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Strange Accident In Amravati As Soon As The Information About The Accident Of The Younger Brother Came To The Spot, The Elder Brother Reached The Spot; Both Brothers Injured In Car Collision

अमरावतीत विचित्र अपघात:लहान भावाच्या अपघाताची माहिती कळताच मोठा भाऊ घटनास्थळी; कारच्या धडकेत दोन्ही भाऊ जखमी

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर जिल्ह्यात कर्तव्यावर असलेल्या लहान भावाच्या कारचा अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेवर अपघात झाल्याची माहीती मिळाल्यामुळे अमरावती शहरात राहणारा मोठा भाऊ अपघातस्थळी पोहचला. यावेळी रस्त्याच्या खाली गेलेली कार रस्त्यावर काढत असतानाच अन्य एका कारने जोरदार धडक दिल्यामुळे पीएसआय जखमी झाले तर त्यांचे मोठे भाऊ मृत्यूमुखी पडले. ही खळबळजनक घटना रविवारी (दि. ४) दुपारी घडली आहे.

सुभाष नामदेवराव सुरजुसे (37, रा. लघुवेतन कॉलनी, अमरावती) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे तर महादेव नामदेवराव सुरजुसे (33) असे जखमी झालेल्या पीएसआयचे नाव आहे. महादेव सुरजुसे हे पीएसआय असून सद्या नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलिस ठाण्यात ते कार्यरत आहे. रविवारी दुपारी ते पत्नी प्रियकां यांच्यासह कारने मुर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा येथून अमरावती जिल्ह्यातील नांदुरा येथे जाणार होते व नांदुरावरुन नागपूरकडे जणार होते. दरम्यान बडनेरा ते अमरावती एक्सप्रेस हायवेवरील महादेवखोरी पुलाजवळ महादेव सुरजुसे यांच्या कारच्या टायरला दगडाचा मार लागून टायर फुटला आणि त्यांची कार रस्त्याच्या खाली उतरली.

यावेळी कारमध्ये बसलेले महादेव किंवा प्रियंका यांना दुखापत झाली नाही. रस्त्याच्या खाली उतरलेल्या कारमधून त्यांना काही तरुणांनी सुखरूप बाहेर काढले. याचवेळी पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे महादेव खोरी भागात राहणाऱ्या एका तरुणाने सुरजुसे दाम्पत्याला स्वत:च्या घरी नेले. पाऊस सुरू असल्यामुळे प्रियंका त्या तरुणाच्या घरी थांबल्या आणि महादेव व तो तरुण कार काढण्यासाठी क्रेनच्या शोधात बाहेर गेले. त्यानंतर प्रियंका यांनी त्यांचे भासरे सुभाष सुरजुसे यांना फोन करुन कारचा अपघात झाल्याची माहीती दिली. तसेच नांदुरा येथे राहणाऱ्या त्यांच्या भावालाही सांगितले. ही माहीती मिळाल्यामुळे सुभाष हे दुचाकीने तत्काळ लहान भावाच्या कारचा अपघात झाला होता, त्याठिकाणी पोहचले.

त्यावेळी खाली उतरलेली कार रस्त्यावर काढत असताना मार्गावरुन जाणाऱ्या अन्य एका कारने सुभाष व महादेव यांच्यासह बाहेर काढण्यात येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत महादेव जखमी झाले तर सुभाष यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसरीकडे प्रियंका या भासऱ्यांना फोन करत होत्या मात्र त्यांनी उचचला नाही, एकदा त्यांचा फोन दुसऱ्याच व्यक्तीने उचलून त्यांचा अपघात झाल्याची माहीती दिली. त्यामुळे त्या घटनास्थळावर पोहचल्या असत्या, त्यांना हा घटनाक्रम माहीत झाला. या अपघात जखमी झालेले पीएसआय महादेव सुरजुसे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या प्रकरणात प्रियंका सुरजूसे यांच्या तक्रारीवरुन फ्रेजरपुरा पोलिसांनी धडक देणाऱ्या कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. धडक देणारा कारचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. अशी माहीती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...