आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण‎:रस्त्याचा वाद; शेतकऱ्यांनी‎ शेतातच सुरू केले उपोषण‎

आर्णी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जांब (जवळा) येथील एका‎ रस्त्याचा वाद गेल्या आठ महिन्यापासून‎ निकाली निघाला नाही. शेवटी त्रस्त‎ झालेल्या शेतकरी कुटुंबाने शेतातच‎ बुधवार, दि. एक फेब्रुवारी रोजी पासून‎ आमरण उपोषणाला सुरूवात केली.‎गावातील दोन शेतकऱ्यांनी आठ‎ महिन्यांपूर्वी ज्ञानदेव इंगोले यांच्या शेतात‎ ये-जा करण्याचा रस्ता प्रतिबंधित केला.‎ त्यामुळे त्यांनी शेत वहिवाटीसाठी रस्ता‎ मिळण्याकरिता येथील तहसील‎ कार्यालयात ६ जून २०२२ रोजी अर्ज दिला.‎ त्वरीत रस्ता देण्यात यावा, अशी मागणी‎ सुद्धा शेतकरी कुटुंबाने केली होती.‎

रस्त्याचा वाद अजूनही तहसिल‎ कार्यालयात सुरूच असून, पाहता पाहता‎ खरीप हंगाम समाप्त झालेला आहे. रब्बी‎ हंगाम सुरू आहे. चालू हंगामामध्ये शेतात‎ चना, कापूस, हळद, तुर आदी महत्वाची‎ पिके उभी आहेत. तेव्हा सदर पिकांचे‎ संवर्धन करणे, पाणी देणे आणि परिपक्व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ झालेला माल शेतातून घरी आणण्यासाठी‎ गाडी बैलांसह यांत्रिक वाहनांसाठी रस्ता‎ आवश्यक आहे. हा प्रश्न आजूनही‎ प्रलंबित आहे.

त्यामुळे बुधवारपासून जांब‎ येथील शेतात गट नंबर १९ मध्ये आमरण‎ उपोषण सुरू केले. तत्पूर्वी न्यानदेव रामचंद्र‎ इंगोले यांनी एसडीओंच्या माध्यमातून‎ जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. निवेदन‎ देवूनही रस्त्याचा प्रश्न जैसे थे असल्याने‎ अखेर कंटाळून जांब येथील ज्ञानदेव‎ इंगोले, दुर्गा इंगोले या शेतकऱ्यांनी त्यांच्या‎ शेतातच सकाळपासून आमरण उपोषणाला‎ सुरूवात केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...