आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा उपक्रम:स्ट्रीट फर्निचरही लावणार; 69 ठिकाणी मुख्य रस्त्यावर ‘गॅण्ट्री’ बसवणार

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहन चालकांच्या सुरक्षेला महत्त्व देत रोड सेफ्टी व स्ट्रीट फर्निचर शहराच्या विविध भागात बसवण्यासाठी मनपा कामाला लागली असून या अंतर्गतच शहरातील ६९ ठिकाणी मुख्य रस्त्यांवर गॅण्ट्री बसवले जाणार आहेत. ‘दिव्य मराठी’ने मनपा क्षेत्रात रोड सेफ्टी व स्ट्रीट फर्निचरचा अभाव असल्याचे वृत्त २५ मे रोजी प्रसिद्ध केले होते.

रोड सेफ्टीसाठी आवश्यक उपाययोजना सुरू
रोड सेफ्टी व स्ट्रीट फर्निचर शहरातील वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली. या अंतर्गतच गर्ल्स हायस्कूल चौकात एलईडी स्ट्रिप बसवण्यात आली आहे. -डॉ. प्रवीण आष्टीकर, प्रशासक, मनपा.

बातम्या आणखी आहेत...