आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात दरदिवशी वाढत असलेले कोरोनाचे नवीन रुग्ण व मृतकांचे आकडे थरकाप उडवणारे आहे. वाढत्या कोरोनाला आळा बसावा म्हणून महिनाभरापासून निर्बंध होते मात्र, ते कुचकामी ठरले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात रविवारी (दि.९) दुपारी १२ वाजेपासून १५ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात शहर व जिल्ह्यात हॉस्पिटल व मेडिकल वगळता सर्वच बंद राहणार आहे. तसेच वैद्यकीय आणि अत्यावश्यक कामाशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही, असा आदेश शुक्रवारी (दि. ७) जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढला आहे.
सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पीठाची गिरणी आदी दुकाने तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यालये, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरणसुद्धा घरपोच यावेळेतच करता येणार आहे.
उद्यापासून कडक लॉकडाऊन..
राहील. सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाच्या निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. सदर दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत सुरु राहील. सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांना ऑनलाइन स्वरूपात वेगवेगळ्या प्रमाणपत्र व सुविधांसाठी अर्ज करता येतील. दस्त नोंदणीचे काम पूर्णपणे बंद राहील. एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ मूलस्थानी पद्धतीने कामकाज सुरु राहील. मालवाहतूक व रुग्ण वाहतूक करणाऱ्या वाहनांना व शासकीय वाहनांना परवानगीची गरज नाही. मात्र, मालवाहतूक साठा, खत साठा आदींबाबत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी आहे. इतर कारणांसाठी व आवश्यक वैद्यकीय कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहतूक करावयाची असल्यास https:/covid19.mhpolice.in/ या वेबसाइटवरून ई-पास काढून वाहतूक करता येईल.
बँका, पोस्टही दुपारपर्यंत राहणार सुरू
सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस ही कार्यालये नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. त्याशिवाय ग्राहकांना ऑनलाइन सेवा पुरवण्याचे आदेश आहेत.
परवानगी दिलेल्या बाबींसाठीच वाहनांना डिझेल, पेट्रोल देण्याचे पंपधारकांना निर्देश
परवानगी दिलेल्या बाबींसाठीच वाहनांना इंधन देण्याचे आदेश पेट्रोल पंपधारकांना दिले. मालवाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल, डिझेल मिळेल मात्र इतरांना इंधन मिळणार नाही. गॅस एजन्सीमार्फत गॅस सिलिंडरचे वितरण व्हावे मात्र, ग्राहकांनी गॅस एजन्सीत प्रत्यक्ष जाऊन गॅस नोंदणी किंवा सिलिंडर घेऊ नये.
कोरोनाचे नवे ११२५ रुग्ण; १३ जणांचा बळी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७३ हजारांवर
अमरावती | शहर व जिल्ह्यात २४ तासांत नव्याने १ हजार १२५ कोरोना रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला. या १३ मृत्यूमुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यात एकूण संख्या १२२८ झाली. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७३ हजार ८ झाली. जिल्ह्यात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. मागील आठ दिवसांपासून प्रत्येक दिवशी हजारांवर रुग्ण आणि १५ ते २० मृत्यू होत असल्यामुळे सर्वसामान्यांचा थरकाप उडत आहे.२४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये साईनगरमधील ८२ वर्षीय महिला, किरणनगर ५८ वर्षीय पुरूष, वाठोडा खुर्द गावातील ४८ वर्षीय महिला, खोलापूरी गेट ७५ वर्षीय पुरूष, अचलपूर ५० वर्ष पुरूष, म्हाडा कॉलनी ७० वर्ष पुरूष, पुर्णानगर ८४ वर्ष पुरूष, वरुड ६५ वर्ष महिला, अचलपूर ५० वर्ष पुरूष, चांदूर बाजार ५० वर्ष पुरूष, महेन्द्र कॉलनी ४० वर्ष पुरूष, कारंजा घाडगे ७४ वर्ष पुरूष आणि नागपूर ७० वर्ष पुरूष यांचा समावेश आहे.
हे राहणार सुरू
सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मेडिकल स्टोअर्स, दवाखाने, ऑनलाइन औषध सेवा २४ तास सुरु ठेवता येईल. चष्म्याची दुकाने बंद राहणार असली तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्याशी जोडलेल्या चष्मा दुकानातून चष्मा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील.
हे राहणार संपूर्ण बंद
सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटी पार्लर हे संपूर्ण बंद राहणार आहेत. सर्व चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद राहतील. ऑनलाइन शिक्षण-प्रशिक्षण चालू राहील.
मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्वच राहणार बंद
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारात सकाळी अशी गर्दी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.