आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यव्यापी संप:संपात कर्मचाऱ्यांची अंजनगाव‎ तहसीलसमोर घोषणाबाजी‎

अंजनगावसुर्जी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यव्यापी संपात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील‎ सरकारी, निमसरकारी, शिक्षक संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला. या‎ वेळी कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयापुढे एकच मिशन, जुनी पेन्शन‎ योजना, अशी घोषणाबाजी करून सरकारचा निषेध नोंदवला. या‎ संपात तालुक्यातील शिक्षक संघटना, नगरपरिषद, महसूल, आरोग्य,‎ बांधकाम विभाग, कृषी समिती, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना,‎ सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग, आरोग्य विभागाचे‎ कर्मचारी सहभागी झाले. १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्ती झालेल्या‎ सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन सरकारचा निषेध‎ केला. तसेच तहसीलदारांमार्फत सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीने‎ मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही‎ तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही, असे याप्रसंगी जाहीर केले.‎

बातम्या आणखी आहेत...