आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक आणि विवेकी दृष्टिकोन निर्माण होणे गरजेचे : ‘भुरा’कार डॉ. शरद बाविस्कर

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवस्था मग त्या शैक्षणिक असू द्या किंवा सामाजिक अथवा राजकीय, धार्मिक किंवा जातीय. त्यांचे नीट आकलन होणे गरजेचे आहे. या व्यवस्थांचा समाज जीवनामधील हस्तक्षेप चिकित्सक दृष्टीने विद्यार्थ्यांनी समजावून घ्यायला हवा. तसेच त्यासाठी सतत प्रयत्नशील राहून विवेक वादी दृष्टिकोन विकसित करायला हवा, असे प्रतिपादन ‘भुरा’कार डॉ. शरद बाविस्कर यांनी केले.

येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त भाषाभवनच्यावतीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील फ्रेंच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, विचारवंत आणि “भुरा’ या बहुचर्चित आत्मकथनाचे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांच्याशी मुक्त संवाद घडवून आणला गेला. या निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक डॉ. अंजली देशमुख होत्या. त “भुरा “ हे पुस्तक युवा पिढीला विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी असे आत्मकथन ठरेल हे सांगतानाच यातील नायकाचा संघर्ष अनुभवून विद्यार्थी त्यातून नक्कीच बोध घेतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. बाविस्कर यांच्याशी विद्यार्थ्यांनी प्रश्नाद्वारे चर्चा केली.

प्रास्ताविक डॉ. दुर्गेश बोरसे यांनी केले. “भुर” या ग्रंथासंदर्भात मराठी विभागप्रमुख डॉ केशव तुपे यांनी आत्मकथनातील काही अनुभव आणि महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. आभार पदव्युत्तर विभागाचा विद्यार्थी विकास राठोड याने मानले

बातम्या आणखी आहेत...