आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे अमरावती जिल्हा भारत स्काऊट गाइडचा ३९ वा जिल्हा मेळावा वरुड येथे न्यू इंग्लिश हायस्कूल येथे नुकताच पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील ७२ शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये सुमारे ८०० स्काऊट गाईड सहभागी होते. यातच धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या मेळाव्यात सेफला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह विद्यालयाचे स्काऊट शिक्षक विनायक कडू, कैलाश चौधरी, पवन लांबाडे व मनोज राजनकर हेसुद्धा सहभागी झाले होते. स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सांगितलेले व्यायामाचे प्रकार मेळाव्यादरम्यान सहभागी स्काऊट व गाईड यांना समजावून सांगितले. तसेच त्यांना त्यानुसार व्यायामाचे धडे देण्यात आले.
त्यानंतर तंबू निरीक्षण, विविध स्पर्धा, ध्वजारोहण, समूहगीत स्पर्धा, बँड संचालन स्पर्धा घेण्यात आल्यात. गावातून शोभायात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे मिळावे, याकरिता मेळावा काळात विद्यार्थ्यांचे तंबूमध्ये वास्तव्य राहते. विद्यार्थी स्वतः स्वयंपाक करतात. त्यामध्ये बिना भांड्याचा स्वयंपाक यासारख्या स्पर्धा घेतल्या. यात विद्यार्थी गटाप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले. या मेळाव्यात सेफला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांचे व स्काऊट शिक्षकांचे प्राचार्य गणेश चांडक, उपप्राचार्य प्रशांत शेंडे, पर्यवेक्षक गोपाल मुंधडा व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.