आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ‘सीजीई’सोबत करार:श्री शिवाजी संस्थेच्या विद्यार्थ्यांना आता वैश्विक शिक्षणाच्या संधी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेने अमेरिका येथील कन्सोर्टियम फॉर ग्लोबल एज्युकेशन (सीजीई) या संस्थेसोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याने या संस्थेतील विद्यार्थी व प्राध्यापकांना आता वैश्विक शिक्षणाच्या संधी प्राप्त होणार आहेत. संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनात संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य हेमंत काळमेघ आणि सचिव डॉ. व्ही. जी. ठाकरे यांनी शनिवारी रात्री नागपूर येथे या करारावर स्वाक्षरी केली.

या करारामुळे या संस्थेतील विद्यार्थी व शिक्षक-प्राध्यापक सात देशांमधील ४० विद्यापीठे आणि महाविद्यालयांसोबत जोडण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ग्लोबल शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक देवाण-घेवाण करण्यासाठी या कराराचा मोठा फायदा होईल, असे संस्थेचे म्हणणे आहे.

‘सीजीई’तर्फे ३५८ एक्सचेंज अभ्यागतांनाच प्रायोजित सीजीई या संस्थेचे जाळे खूप विस्तारलेला आहे. ‘यूएसए’मधील ३९ युनिव्हर्सिटी/कॉलेज कॅम्पस आणि ९० पेक्षा जास्त राष्ट्रांसह धोरणात्मक शैक्षणिक आणि सामायिकरणाच्या संधी असलेल्या ७ देशांमधील संस्था त्यांच्या सदस्य आहेत. या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सुसज्ज वर्गखोल्या, नर्सिंग व बिझनेस मधील विशेष अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांना सरावाची संधी आहे. सीडीने ३५८ एक्सचेंज अभ्यागतांनाच प्रायोजित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...