आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभ्यासासोबतच विद्यार्थ्यांची खेळामध्येही रुची असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एडीफाय शाळेचे संस्थाध्यक्ष पुरणलाल हबलानी यांनी केले. एडीफाय शाळेमध्ये सी. बी. एस. सी. क्लस्टर ९ व्या टेबल टेनिस स्पर्धेचे सोमवारी (दि. १२) उद््घाटन पार पडले. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रसंगी त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व खेळाडूंचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे, संस्थेच्या संचालक नीरू कपाई, व्यवस्थापक व सचिव रोहन कपाई, कोषाध्यक्ष शिवारामा कृष्णा, प्राचार्य डॉ.चैताली कुमार, संस्थेचे प्रमुख सदस्य रवी इंगळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर मार्च पास करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून स्पर्धेचे उद््घाटन करण्यात आले.
या प्रसंगी अभिराज भट्टड, कुंज हबलानी व समीर पिंजारी यांनी पेटत्या मशालीने क्रीडांगणाला फेरी मारली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून भारतीय एकतेचे दर्शन घडवले. मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन करीत सभेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक, खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातून ३० वर मुला-मुलींचे संघ सहभागी झाले आहेत.
एडीफाय शाळेमध्ये महाराष्ट्र व गोवा रिजनच्या संयुक्त सहकार्याने ९ व्या सीबीएससी क्लस्टर १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील चार दिवसीय टेबल टेनिस स्पर्धांना सोमवारपासून (दि. १२) प्रारंभ झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र व गोवासह एकूण २५ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी १४, १७ व १९ वयोगटातील मुलांच्या प्रत्येक चमुमध्ये जास्तीत जास्त ४ व कमीत कमी ३ खेळाडू, तर मुलींच्या प्रत्येक चमुत जास्तीत जास्त ४ व कमीत कमी २ खेळाडूंना आमंत्रित केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.