आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील योजनेसाठी विद्यार्थांनी अर्ज करावे:विद्यापीठाकडून आवाहन, विद्यार्थी विकास विभागाद्वारे अनेक योजना

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील व पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी संत गाडगे बाबा कमवा व शिका योजना, संत गाडगे बाबा विद्यार्थीनी बस पास सवलत योजना व संत गाडगे बाबा शिक्षण संरक्षण योजना आदी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवेदन पत्र भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे, तसेच संत गाडगे बाबा शुद्ध पेयजल योजना, विद्यार्थी विकास निधी शिष्यवृत्ती योजना व स्व. प्रा. रामप्रकाश श्यामलालजी राठी स्मृति शिष्यवृत्ती योजना आदी योजनांसाठी अंतिम तारीख ३० सप्टेंबर, तर संत गाडगे बाबा विद्याधन योजनेसाठी अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांबाबत विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांच्या प्रमुखांना विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी पत्र पाठवून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा याबाबत कळविले आहे. योजना व त्याचे आवेदन पत्र भरण्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर स्टुडंट्स डेव्हलपमेंट या शिर्षातील लेटर या उपशिर्षामध्ये दिलेली आहे.

जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी महाविद्यालयांचे प्राचार्य, शैक्षणिक विभागांचे प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी कळविले असून काही अडचण असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे किंवा rajiv.borkarsangeet24@gmail.com यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील व पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांचया हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचे आवेदन पत्र भरण्याची अंतिम मुदतही जाहीर करण्यात आली आहे. या योजनांचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच त्याचा लाभ घेण्यासाठी विहीत मुदतीत आवेदन पत्र भरावेत, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले आहे. याबाबत तशा सुचनाही विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...