आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थी जीवनात अनेक युवक व युवती व्यसनांच्या आहारी जातात, त्यामुळे त्यांचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. प्रेमाच्या नावावर युवक व युवती चुकीच्या मार्ग स्वीकारत आपले करिअर बरबाद करतात. आज अनेक युवक व युवती चौकात चुकीचे काम करताना दिसतात, तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शालेय व महाविद्यालयीन दिवस महत्त्वाचे असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष देत आपल्या पायांवर सक्षम उभे रहावे, असे प्रतिपादन येथील पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे यांनी केले. दर्यापूर येथील शासकीय आयटीआय महाविद्यालयात नेहरू युवा केंद्रद्वारा आयोजित व्यसनमुक्ती जागरूकता, व्यक्तिमत्त्व विकास व करिअरच्या संधी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पीएसआय पाटेखेडे बोलत होते.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. शेंगोकर, प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, प्रमुख मार्गदर्शक वक्ता म्हणून प्रा. धनंजय देशमुख, योग शिक्षक प्रकाश तायडे, प्रा. दिलीप साखरे आदी उपस्थित होते. सुरवातीला दीपप्रज्वलन व पाहुण्यांचे वृक्ष भेट देत कार्यक्रमाला सुरूवात झाली. या प्रसंगी प्रमुख वक्ते धनंजय देशमुख यांनी युवकांना व्यसनमुक्त करायचे असेल, तर त्यांना महापुरुषांचे विचार अंगीकारणे गरजेचे आहे.
युवकांनी आपली स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःच प्रयत्न करून एक भारतीय सुजाण नागरिक म्हणून समाजात आपले नाव कमवावे, असे मत व्यक्त केले. योग शिक्षक प्रकाश तायडे यांनी योगाचे महत्त्व व व्यसनांचे दुष्परिणाम या बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रा. दिलीप साखरे यांनी आजच्या काळातील तरुण यावर आपल्या मनोगतात भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका समन्वयक मनीषा दुदंडे यांनी केले. सूत्रसंचालन राजश्री पाचखंडे, तर आभार प्रदर्शन पायल बैतुले यांनी केले. या प्रसंगी आयटीआयचे विद्यार्थी व विद्यार्थिनी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.