आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:विद्यार्थ्यांनी घ्यावा समाजातील उच्च पदस्थांचा आदर्श - सतिश दरेकर

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभार समाजातील अनेकजण प्रशासकीय यंत्रणेत उच्च पदे भूषवीत आहेत. आयएएस, आयपीएस, राज्य शासनाचे सचिव अशा विविध पदांवर त्यांनी मोहोर उमटवली आहे. अशा अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतिश दरेकर यांनी केले. विदर्भ कुंभार समाज समितीच्या स्थानिक शाखेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बडनेरा रोडवरील शशिनगर स्थित श्री संत गोरोबा काका सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या गुणगौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार रवी राणा, कुंभार सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, सरचिटणीस बबनराव जगदाळे, प्रदेश उपाध्यक्ष वसंतसेठ घोडनदीकर, कोषाध्यक्ष अनंत कुमार, सरचिटणीस अजय विरकर, सदस्य संजय रुईकार, प्रकाश भालेराव, शस्त्रृघ्न प्रजापती, श्री संत गोरोबाकाका समाजोन्नती बहुउद्देशीय समितीचे अध्यक्ष पंजाबराव काकडे, सचिव डॉ. श्रीराम कोल्हे, कार्याध्यक्ष सुरेश नांदुरकर, विदर्भ कुंभार समितीचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. संजय साळवीकर, माजी अध्यक्ष देवीदास धामणकर, प्रभा भागवत, महिला समितीच्या अध्यक्ष संगिता सावळीकर, भगवान जामकर, अरुण पोहनकर यांची विशेष उपस्थिती होती.

कुंभार समाजातील तरुण शैक्षणिक, क्रीडा, संगीत, शास्त्र, विज्ञान आदी विषयांमध्ये पारंगत झाली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजातील पुढील पिढीला व्हावा. नवोदितांना प्रेरणा मिळावी म्हणून या गुणगौरव समारंभाचे विशेष महत्व असल्याचे दरेकर यांनी पुढे स्पष्ट केले. समाजातील तरुण उद्योग, स्वयंरोजगार करण्यास पुढे आल्यास त्यांना सामाजिक संस्था मार्गदर्शन तसेच मदत करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कार्यक्रमादरम्यान 10 वी , 12 वी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात आले. प्रास्ताविक डॉ. श्रीराम कोल्हे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सुधाकर शेंडोकार यांनी करून दिला. संचालन डॉ. विलास नांदुरकर, सौ. प्राजंली काळबांडे यांनी तर आभार सचिव सुरेंद्र सरोदे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे अध्यक्ष सुधाकर शेंडोकार, उपाध्यक्ष अ‍ॅड. गजानन तांबटकर, कोषाध्यक्ष सतिश गावंडे, सचिव सुरेंद्र सरोदे, सहसचिव मधुकर खांडेकर, सुनील भागवत, नंदकिशोर काकडे, विद्यार्थी सहाय्यता निधी समितीचे अध्यक्ष सुरेश नांदुरकर, रामेश्वर वडूरकर, नंदकिशोर नांदुरकर यांच्यासह इतर सदस्यांनी प्रयत्न केले.

हे आहेत सत्कारमूर्ती

पुण्याचे सतिश दरेकर, यवतमाळचे शत्रृघ्न प्रजापती, दर्यापूर येथील सुभाष वडुरकर, नागपूर येथील राम पवनारकर, नाशिक येथील नंदूभाऊ जाधव, अकोला येथील प्रदीप मांगुळकर, प्रा. डॉ. मनोहर मेहरे, वनमाला पेंढारकर, मलकापूर अकोला येथील आदर्श तळोकार यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...