आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने सोमवारी (दि. ६) बी. एस्सी.च्या विद्यार्थ्यांकरिता नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा पार पडली. या वेळी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे नैसर्गिक रंग कसे तयार करावेत, याचे धडे देण्यात आले. यासोबतच धुलीवंदनाकरिता लागणारे रंग नैसर्गिकरित्या घरच्या घरी कसे तयार करतात या बाबत प्रा. शुभांगी सोनोने यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी किमान एका परिवाराला होळीसाठी पाण्याचा अपव्यय टाळून नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमीचा खरा आनंद लुटावा, यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी केले.
कार्यशाळेला रसायनशास्त्र विभागाचे डॉ. अनिल सोमवंशी, प्रा. राहुल सावरकर, डॉ. अपर्णा दिघडे, प्रा. शुभांगी सोनोने, सुनील काळे व विद्यार्थी उपस्थित होते. नैसर्गिक रंगाचा वापर करूनच धुळवड खेळण्याची शपथ विद्यार्थ्यांना या प्रसंगी देण्यात आली. कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त करीत नैसर्गिक रंगाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करू, असा निश्चय विद्यार्थ्यांनी या वेळी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.