आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींमध्ये राज्यातून प्रथम येण्याचा मान:एमपीएससी त यशासाठी हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क आवश्यक ; अंकिता पाचंगे

अमरावती ​​​​​​​2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी ‘हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क’ गरजेचे असल्याचे एमपीएससी तांत्रिक सहायक पद परीक्षेत राज्यातून मुलींमध्ये पहिल्या आलेल्या अमरावतीच्या अंकिता पाचंगे हिने व्यक्त केले. तांत्रिक सहायक पद परिक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आल्यानंतरही एक्साइज उप-निरीक्षक पद स्वीकारणार असल्याचे तिने सांगितले. पाहिल्याच प्रयत्नांत अंकिता उत्तीर्ण झाली. प्रतिकुल परिस्थितीत तिने मुलींमध्ये राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवल्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या अमरावतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

श्री अंबादेवी मंदिराजवळील श्री एकविरा मंगल कार्यालयाजवळील जुनी चुनाभट्टी भागातील रहिवासी अंकिताने राज्य सेवा आयोगाद्वारे विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या १२ स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत.‎ त्यापैकी पहिल्याच प्रयत्नांत तिने तांत्रिक सहायक,‎ राज्य उत्पादन शुल्क, दारुबंदी विभागाच्या एक्साइज‎ उप-निरीक्षक, कर सहायक ही परीक्षा उत्तीर्ण केली.‎

त्याचप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखत व‎ चाचणीसाठीही ती पात्र ठरली आहे. कोरोना काळात‎ ग्रंथालय बंद असल्याने तिने आपल्या अभ्यासाची जिद्द‎ सोडली नाही घरी सातत्याने तिने अभ्यास करत‎ आयोगाच्या परीक्षेची तयारीं केली त्यातूनच तिला हे‎ यश मिळाले आहे. तिचे वडील सुरेश पाचंगे हे‎ माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर येथे ज्येष्ठ अधीक्षक‎ आहेत.

मनपा अभ्यासिकेतील तीन विद्यार्थ्यांनीही मिळवले यश
मनपाद्वारे संचालित स्पर्धा परीक्षा, अभ्यासिका केंद्र, गोपाल नगर येथे नियमितपणे अभ्यास करणारे तीन विद्यार्थी एमपीएससीद्वारे विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गौरव घनश्याम दंदेने सहायक कक्ष अधिकारी, प्रज्ज्वल जनार्दन गवईने भारतीय रेल्वे चेन्नई येथील स्टेशन मास्तर आणि आनंद नामदेव भुजबळने सीआयएसएफ काॅन्स्टेबल पदाच्या परीक्षेत यश संपादन केले.

त्यामुळे मनपाची गोपाल नगर येथील अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरत असल्याचे उद्गार मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांनी काढले. महिला व बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी पुढाकार घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कारकीर्द घडवण्यास इच्छुक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्र विविध भागात सुरू केले. हा राज्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला. तेव्हापासून शेकडो विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवून विविध शासकीय पदांवर नियुक्ती मिळवली आहे. शासनाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक पुस्तके मुबलक प्रमाणात अभ्यासिकांमध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयी पुरवण्याकडे मनपा आयुक्तांचेही लक्ष असते.

यशस्वी तिन्ही विद्यार्थ्यांचे मनपा आयुक्तांनी रोप देऊन अभिनंदन केले. त्यांच्या यशामुळे अभ्यासिका केंद्रात अभ्यास करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना यश मिळेल, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महिला व बाल कल्याण अधिकारी नरेंद्र वानखडे, माजी सभागृह नेते सुनील काळे, कर्मचारी अमोल साकुरे, श्रीधर हिवराळे, किशोर वायधने आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...