आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन‎:श्री हनुमान जयंतीची‎ शहरात जय्यत तयारी‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र पौर्णिमा गुरुवार, ६ एप्रिल‎ रोजी शहरासह जिल्हाभरात श्री ‎ ‎ हनुमान जयंती साजरी होणार‎ असून, शहरातील रवीनगर‎ येथील संकटमोचन श्री हनुमान ‎ ‎ मंदिर, जहांगिरपूर येथील श्री‎ महारुद्र हनुमान मंदिर, चांगापूर ‎ ‎ येथील श्री हनुमान मंदिर तसेस ‎ ‎ विविध हनुमान मंदिरांमध्ये‎ अभिषेक, पहाटे जन्मोत्सव,‎ अखंड रामायण, महाआरती व ‎ ‎ महाप्रसाद असे विविध कार्यक्रम ‎ ‎ होणार आहेत.‎ श्री हनुमान चालिसा चॅरिटेबल‎ ट्रस्ट, अमरावती द्वारे श्री हनुमान‎ जन्मोत्सवाच्या पर्वावर तसेच‎ खासदार नवनीत राणा यांच्या‎ वाढदिवसानिमित्त महिला, पुरुष‎ व युवकांचे सामूहिक हनुमान‎ चालिसा पठण सकाळी ८.३०‎ वाजता वीर हनुमानजी‎ खंडेलवाल लाॅन, बडनेरा रोड,‎ तापडिया माॅल येथे होणार आहे.‎ यावेळी सामूहिक हनुमान‎ चालिसा पठण करणाऱ्या‎ भाविकांना हनुमान चालिसा भेट‎ दिला जाणार आहे.;‎ जिल्ह्यातील सर्वच मंदिरांमध्ये‎ ‘जय बजरंगबली जय हनुमान’‎ असा जयघोष ऐकू येईल.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

‎ ‎ ‎ आतापासूनच श्री हनुमान‎ जन्माची तयारी मंदिरांमध्ये सुरू‎ झाली असून, कुठे हनुमान‎ चालिसा पाठ तर कुठे अखंड‎ रामायण सुरू आहे. उद्या पहाटे‎ श्री हनुमानजीचा जन्म‎ झाल्यानंतर अखंड रामायण‎ पाठाची पूर्णाहुती व नंतर‎ महाप्रसाद वितरण सुरू हाेणार‎ आहे. यासाठी मंदिरांमध्ये फुले,‎ पताका, विद्युत रोषणाई द्वारे‎ सजावट करण्यात आली असून‎ मोठे प्रवेशद्वार, ठिकठिकाणी‎ पिण्याच्या पाण्याच्या वितरणाची‎ तयारी, प्रसाद वाटपाची तयारी‎ सुरू असल्याचे दृश्य होते.‎