आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीला अटक:प्रियकराच्या धमक्यांना त्रासून विवाहितेने घेतली फाशी ; नांदगाव पेठ ठाण्यात पतीने नोंदवली तक्रार

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे विवाहितेचे एका युवकासोबत प्रेमसंबंध जुळले. परंतु, याची माहिती विवाहितेच्या पतीला मिळाल्यानंतर तिने प्रियकरा सोबतचे संबंध तोडले. त्यानंतरही आरोपी बजरंग मधुकर साबळे (वय २२) विवाहितेला वारंवार फोन करून बदनामी करण्याच्या धमक्या द्यायचा. यामुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने मंगळवार,दि. ८ रोजी रात्री घरी फाशी लावून आत्महत्या केली. या प्रकरणी विवाहितेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बजरंगला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगापेठ ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव येथील दीपक नगरमध्ये राहणाऱ्या अजय गोपाळराव मनोहर यांची पत्नी बिझीलॅण्ड येथील एका दुकानात काम करीत होते. तेथे काही महिन्यांपूर्वी त्याच दुकानात काम करणाऱ्या बजरंग सोबत तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. परंतु, या प्रेमसंबंधाची माहिती पती अजयला मिळाली. त्यावेळी त्याने त्याची पत्नी व बजरंगला एकमेकांपासून दूर राहण्याची समज दिली. त्यानंतर त्याच्या पत्नीने प्रियकरा सोबत संबंध तोडले. परंतु, त्यानंतरही बजरंग फोनवर विवाहितेला समाजात बदनामी करण्याच्या वारंवार धमक्या देत राहिला. यामुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...