आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या युवराज पिल्ले नामक कैद्याने बुधवारी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कारागृह अधीक्षक भारत भोसले यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुंबई येथील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये राहणारा आरोपी युवराज उर्फ सूर्या सेलवन पिल्लेच्या(२७) विरोधात आठ वर्षांआधी मुंबई येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या आरोपात गुन्हा दाखल झाला होता. २ ऑगस्ट २०१९ मध्ये बोरीवली येथील न्यायालयाने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई येथील या आरोपीला अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले. आज अचानक त्याने तोंडात लपवलेले ब्लेड काढून स्वतःच्या मानेवर वार केले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे घेणार बयाण
मध्यवर्ती कारागृहातील अधीक्षकांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे युवराज पिल्ले विरोधात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयाण घेतले जाईल. गोरखनाथ जाधव, पोलिस निरीक्षक फ्रेजरपुरा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.