आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:दारापुरात गळफास लावून आत्महत्या

दर्यापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दारापूर व नालवाडा येथील आत्महत्येच्या दोन घटना ताज्या असतानाच शनिवार (दि. ६) दारापूर येथे पुन्हा एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घडली.

अविनाश रुपरावजी वानखडे (४९, दारापूर) असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश वानखडे हे भूमिहीन असून मागील काही महिने ते मुंबई येथे खासगी कंपनीमध्ये काम करत होते. गेल्या चार महिन्यांपासून ते गावातच वास्तव्यास होते. दरम्यान शनिवारी सकाळी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे वानखडे यांच्या लहान मुलाने भिंतीवरून घरात प्रवेश करुन दरवाजा उघडला असता अविनाश वानखडे यांंनी दुपट्टाच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. खोलापूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पीएसआय संजय शेंडे, सुरज यांनी घटनास्थळ गाठले होते. मृतकाच्या पश्चात पत्नी, १९ वर्षांची मुलगी, १७ वर्षांचा मुलगा, आई असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...