आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या:कर्जामुळे होते नैराश्यात, दारापुरात झाडाला गळफास घेत संपवले जीवन

प्रतिनिधी । दर्यापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती कळताच खोलापूर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दर्यापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सामायिक 2 एकर शेती

सोपान जानराव गुरदे (वय ४८) असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोपान गुरदे यांच्याकडे सामायिक मालकीची दोन एकर शेती आहे. तसेच, त्यांच्याकडे बैलजोडी असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील आंतरमशागत व डवरणीची कामे करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांच्या नावावर कर्ज असल्यामुळे ते अलिकडे निराश होते. याच नैराश्यातून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला.

गावावर शोककळा

गुरुवारी पहाटेच्या सुमारास पांढरी-खोलापूर परिसरातील एका झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अत्यंसस्कार करण्यात आले. सोपान गुरदे यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...