आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:दूषित पाण्याऐवजी शुद्ध पाण्याचा पुरवठा करा; निवेदनाद्वारे नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

शेंदुरजनाघाट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपालिकेद्वारे मागील दोन महिन्यांपासून शहरवासीयांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रवींद्र पाटील यांची भेट घेत या संदर्भात चर्चा करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. मात्र, ही बाब वारंवार पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शहराला दूषित पाण्याऐवजी शुद्ध पाण्यासह नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी महादेव खेरडे, अशोक लिखितकर, अरुण शेळके, सुरेश धोटे, डॉ. सुनील मेहरे, शंकर बेलसरे, अनिल आंडे, भाऊराव वाढवे, योगेश दुपारे, गजानन गोरडे, देविदास वंजारी, अरुण पाटील आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...