आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घड्याळच बंद पाडायचे तर बारामतीतूनच पाडू:सुप्रिया सुळेंना शरद पवारांच्या नावाचा आधार घ्यावा लागतो- चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीसह खासदार सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांचा आधार घ्यावा लागत आहे. तो कुठपर्यंत घेणार? हे 21 वे शतक आहे ही बाब राष्ट्रवादीने विसरू नये. सध्या कुणाच्याही नावाने निवडून येण्याचे दिवस नाहीत काम बघितले जाते असा जोरदार टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज लगावला. बारामती वगळता विभागातील इतर कोणत्याही जिल्ह्यांचा विकास झाला नाही. त्यामुळे आम्ही बारामतीतूनच घड्याळ बंद पाडू असेही त्यांनी ठणकावले.

सत्र न्यायालयात भाजपच्या विरोधातील एका प्रकरणाच्या सुनावणीसह अमरावती शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले असता आ. बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

विधान दिले लक्षात आणून

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार विरोधक म्हणून ज्या-ज्या वेळी राज्यात दौरे करतात त्यावेळी ते राज्यात सत्तेत येऊन बसतात, असे विधान नुकतेच खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ही जोरदार टीका केली.

पवार कितीदा निवडून येणार?

बावनकुळे म्हणाले, पवार यांच्या नावाने कितीदा निवडून येणार? गेल्या आठ वर्षांंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विश्वगुरू बनविण्याच्या मार्गावर आणून ठेवले. त्यांचे काम बोलत आहे. त्यांच्या नावाने निवडूनही येता येईल. पण, पवार यांच्या नावाने निवडून येण्याचे दिवस आता संपले आहेत.

इडी त्यांच्यापद्धतीने काम करतेय​​​​

सरनाईक, भावना गवळी यांची चौकशी ईडीद्वारे थांबविण्यात आली. याबाबत कोणतेही नेते भाजपमध्ये गेले की त्यांच्यावर ईडी कारवाई करीत नाही काय? असे विचारले असता ईडी ही स्वतंत्र संस्था आहे. ती तिच्या पद्धतीने काम करते. चौकशी, तपासणी, न्यायालयीन प्रक्रिया व कारवाई या तीन वेगवेगळ्या बाबी आहेत. यांची सरमिसळ करू नका. एकदा का पुराव्यांसह न्यायालयात गुन्हेगार सिद्ध झाला की मग तो कोणीही असाला तरी तो सुटणार नाही. त्याला तुरुंगातच खडी फोडावी लागेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

माझ्या खात्याचीही चौकशी झाली

बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील भाजप नेत्यांचीही चौकशी केली. माझ्याही ऊर्जा खात्याची चौकशी केली. मात्र, त्यात काहीच आढळले नाही.

बातम्या आणखी आहेत...